हनुमान (भगवा) झेंड्याच्या प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप समोरासमोर
कर्नाटक : मंड्या जिल्ह्यातील केरागोडू गावात 108 फूट झेंड्याच्या पोलवरील हनुमान (भगवा) झेंड्याच्या प्रकरणावरुन वादाला तोंड फुटलं आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेस-भाजप समोरासमोर आले आहेत. Mandya’s Keragodu गावामध्ये जमावबंदी कलम 144 लागू करण्यात आले आहे. सध्या परिसरात तणाव आहे. बेंगळुरुमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केलं असून अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. (Karnataka village tense after Hanuman flag removed. Hanuman flag removed in Karnataka village)
मागील आठवड्यामध्ये काही व्यक्तींनी 108 फूट झेंड्याच्या पोलवर चढून हनुमान झेंडा फडकवला होता. ग्राम पंचायतने झेंडा लावण्याची परवानगी दिली होती. पण, त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांना हनुमान झेंडा काढण्याची विनंती करण्यात आली होती. पण, गावकरी झेंडा न काढण्यावर ठाम होते. काही लोक याचे राजकारण करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावात तणाव निर्माण झाल्याने आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले. गावकऱ्यांना भाजप कार्यकर्ते आणि बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली आहे (saffron flag featuring lord Hanuman in Mandya’s Keragodu village).
गावकऱ्यांनी झेंडा काढण्याच्या विरोधात दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शनिवारी वाद चिघळला. रविवारी ग्राम पंचायतचे कर्मचारी झेंडा काढण्यासाठी आले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी जमून गो बॅकच्या घोषणा देत विरोध दर्शवला. स्थानिक काँग्रेस आमदार रवी कुमार यांचे काही बॅनर फाडण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाने राजकीय वळण घेतले. त्यामुळे पोलिसांकडून फौजफाटा वाढवण्यात आला आहे. भाजपने झेंडा काढण्याच्या विरोधात आंदोलन तीव्र केले आहे. भाजपने कर्नाटकच्या प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात केली आहे. माहितीनुसार, भगवा झेंडा उतरवण्यात आला आहे.
Hanuman flag removed in Karnataka
काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देशाचा ध्वज काढून त्याठिकाणी भगवा ध्वज लावण्यात आला होता. हे योग्य नाही. त्यामुळे मी अधिकाऱ्यांना राष्ट्रीय ध्वज परत फडकवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, मंत्री चेलुवरायास्वामी म्हणाले की, देशाच्या ध्वज काढून भगवा फडकवण्यात आला. आम्हीपण रामभक्त आहोत. पण, भगवा खासगी ठिकाणी किंवा मंदिराच्या ठिकाणी लावता येईल. त्याला आमचा पाठिंबा असेल.
Hanuman flag removed in Karnataka
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements