बेळगाव : घंटागाडीला देण्यात येणारा कचरा आता घरातच वेगळा करावा लागणार आहे. कचऱ्याचे वर्गीकरण घरातच करून तो घंटागाडीला द्यावा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. वास्तविक हा नियम आधीपासूनच असला तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नव्हती. यापुढे मात्र, घरातील ओला, सुका आणि घातक कचरा वेगळा करुनच सफाई कामगारांकडे द्यावा लागणार आहे.
वर्गीकरण न केलेला कचरा स्वीकारु नये, अशा सूचनाही आरोग्य विभागानेसफाई कामगारांना दिल्या आहेत. मुळात ही संकल्पना नवीन नाही. घरोघरी कचरा वर्गीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आठ वर्षांपूर्वी महापालिकेने काही जणांनाच हिरव्या आणि निळ्या डस्टबिनचे वाटप केले होते. मात्र, त्याची काटेकोर अंमलबजावणी न झाल्याने महिनाभरातच ही योजना बंद पडली. नव्या आयुक्त शुभा बी. यांनी ही संकल्पना काटेकोर राबविण्याचा निर्धार केला असून तशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे, घरातच कचरा वर्गीकरण करणे पुन्हा एकदा अनिवार्य करण्यात आले आहे.
सर्व प्रभागातील महापालिका कर्मचारी आणि कंत्राटी सफाई कामगारांना या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ओला कचरा तुरमुरीतील कचरा प्रक्रिया केंद्रात पाठविला जातो, सुका कचरा सिमेंट कंपन्यांना पुनर्वापरासाठी दिला जातो तर घातक कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाते.
महिन्याच्या सुरवातीला आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर शुभा यांनी शहरभर पाहणी केली असता उगमस्थानीच कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे घरातच कचरा वर्गीकरण करण्यासाठी जनजागृती करुन या नियमाची कठोर अंमलबजावणी तत्काळ सुरु करण्याचे आदेश त्यांनी दिले. सुरवातीला बहुतांश रहिवासी या नियमाचे पालन करण्यास नाखूष होते. परंतु, नियमांचे पालन न करणाऱ्या घरांमधून कचरा उचलणे थांबविण्याचा इशारा देताच कचरा वेगळा करुन देण्याचे प्रमाण वाढले आहे.
Blue dustbin is for disposing dry garbage
Blue dustbin is for disposing dry garbage
Blue dustbin is for disposing dry garbage
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements