- मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा इशारा, काय आहे प्रकरण?
- काँग्रेस सरकारच्या ‘पंचहमी’ची खोटी माहिती पसरवली
- भाजपच्या महाराष्ट्र शाखेवरही कायदेशीर कारवाई करण्याचा विचार
Siddaramaiah may sue Maharashtra government over false ads on Karnataka schemes
कर्नाटक : आमच्या प्रशासनाच्या प्रमुख ‘पंचहमी’ योजनांबाबत निवडणुकीत खोट्या जाहिराती दिल्याचा आरोप करुन कर्नाटक सरकार महाराष्ट्र सरकारविरुद्ध खटला दाखल करण्याचा विचार करत असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील महायुती (Mahayuti) सरकारविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. मते मिळविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा उद्देश आहे. पंतप्रधान खोटे बोलत आहेत. महाराष्ट्र सरकारकडून खोटी जाहिरात दिली आहे. महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक सरकारच्या ‘पंचहमी’ योजनांवर निशाणा साधत होते.
कायदेशीर कारवाई करण्याबाबत माहिती घेत आहे. महाराष्ट्र सरकारच्या विरोधात खटला दाखल करण्याचा आम्ही विचार करत आहोत. कारण त्यांनी खोट्या जाहिराती दिल्या. कर्नाटक सरकार ‘पंचहमी’ योजनांवर वर्षाला ५६ हजार कोटी रुपये खर्च करत आहे. भाजप म्हणत आहे, आमच्याकडे पैसा नाही. मग भाजपची सत्ता असलेल्या इतर राज्यांत अशा योजना का राबवल्या जात नाहीत?’’
सिद्धरामय्या यांनी शनिवारी देखील सांगितले होते की, काँग्रेस सरकारच्या ‘पंचहमी’ची खोटी माहिती पसरवली जात आहे. भाजपच्या महाराष्ट्र शाखेवरही कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहोत. धजदचे एच. डी. कुमारस्वामी यांनी सत्तेत असताना ‘पंचहमी’ योजना दिल्या होत्या का, असा सवाल करत सिद्धरामय्या यांनी काँग्रेस सरकारच्या ‘पंचहमी’ योजनांवर भाष्य करण्याचा त्यांना कोणता नैतिक अधिकार आहे, असा सवाल केला.
Siddaramaiah may sue Maharashtra government
Siddaramaiah may sue Maharashtra government
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements