पंतने दिलं स्पष्टचं उत्तर, VIDEO होतोय व्हायरल
Nathan Lyon teases Rishabh Pant with IPL 2025 auction question, Indian keeper’s two-word reply goes viral : Watch
Viral Video : पर्थमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटीतील पहिल्या डावात भारतीय संघ १५० धावा करत सर्वबाद झाला. पण हा कसोटी सामना सुरू असतानाच २४ आणि २५ तारखेला आयपीएलचा महालिलाव जेद्दाहमध्ये पार पडणार आहे. या लिलावात भारत-ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू उतरणार आहेत. याबाबतच ऋषभ पंत आणि नॅथन लायन पंतच्या डावादरम्यान बोलताना दिसले ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
पर्थ कसोटीत टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पण पंत काही वेगळ्याच विचारात आला होता. संघ दडपणाखाली असताना पंतने सावध खेळ केला, पण खेळपट्टी आता फलंदाजीसाठी योग्य आहे असे वाटताच त्याने फटकेबाजी केली. नॅथन ने पंतला विचारले की, तू मेगा ऑक्शनमध्ये कुठे जाणार आहेस? ज्याला उत्तर देताना पंत म्हणाला की, मला काही कल्पना नाही.
Please click here to Watch this Video or photo on X (twitter)
म्हणजेच आयपीएल मेगा लिलावात तुला कोणत्या संघात जायचं आहे, हे नॅथन ला विचारायचे होते. दिल्ली कॅपिटल्सने यावेळी पंतला रिलीज केले आहे. त्यानंतर हा यष्टीरक्षक फलंदाज मेगा लिलावाचा भाग आहे. त्यामुळे ऋषभ पंतची कामगिरी पाहता त्याच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
आयपीएल मेगा लिलावात ऋषभ पंतला मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. पंतचा सध्याचा फॉर्मही चांगला आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंडविरूद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतही पंतने चमकदार कामगिरी केली. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियातही पंतकडून संघाला खूप अपेक्षा आहेत. पंतने पहिल्याच सामन्यात संघाला गरज असताना महत्त्वपूर्ण ३७ धावांची खेळी केली. गेल्या आयपीएलचा हंगामही पंतसाठी चांगला होता, त्यामुळे आता मेगा लिलावापूर्वी पंत यावेळी लिलावाचे सर्व विक्रम मोडू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
Nathan Lyon teases Rishabh Pant with IPL 2025 auction
Nathan Lyon teases Rishabh Pant with IPL 2025 auction
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements