Karnataka to build Global Innovation Parks in Bengaluru, Mysuru, and Belgaum
बेळगाव—belgavkar—belgaum : माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव, म्हैसूर आणि बंगळूर येथे जागतिक इनोव्हेशन पार्क स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. टेक समीटचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
बंगळूर हा राज्य सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्याबरोबरच प्रादेशिक बळही वाढवण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. त्याकरिता सरकार सज्ज झाले असून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी योग्य आणि पारदर्शक धोरण अवलंबण्यात येत आहे. पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे ते म्हणालेदेशात प्रथमच कर्नाटकाने ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (जीसीसी) धोरण जारी केले आहे. याचाच एक भाग म्हणून बेळगावसह तीन शहरांमध्ये इनोव्हेशन पार्क स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जीसीसी स्थापन करण्यासाठी हे पार्क राखीव ठेवण्यात येणार आहेत. तंत्रज्ञानावर आधारित विभागाला प्रोत्साहन देण्यासाठी बौद्धिक आणि डिजिटल विभागात पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक करण्याकरिता भर दिला आहे. ग्रामीण भागाच्या संपर्कासाठी ‘आपले गाव, आपली योजना’ मोहीम जारी करण्याची सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने आयटी-बीटीसह तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यतेमध्ये स्थिरताआणि सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. सॉफ्टवेअर, बायोटेक्नॉलॉजी, एअरोस्पेस व विकसित उत्पादनांसाठी बंगळूरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा बदल घडवून आणण्यामध्ये कर्नाटक अग्रेसर आहे. बंगळुरातील जागतिक नाविन्यता ही ज्ञान, आरोग्य आणि नाविन्यतेच्या शहराचा भाग असेल. कॅपगौडा विमानतळापासून ४५ मिनिटांच्या अंतरावर जागतिक इनोव्हेशन आणि रिसर्च केंद्र असेल, अशी माहिती त्यांनी दिली.
Global Innovation Parks
Global Innovation Parks
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements