महिलेने गमावले हात, थरकाप उडवणारी घटना
कर्नाटक : हेअर ड्रायरच्या स्फोटात एका महिलेने आपल्या हाताचे तळवे आणि बोटं गमावली आहेत. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात ही भयंकर घटना घडली आहे. इलकल शहरात हेअर ड्रायरचा स्फोट झाल्याने एका जवानाच्या पत्नीला आपले दोन्ही हात गमवावे लागले.
सध्या महिला रुग्णालयात दाखल आहे. मैत्रिणीने हेअर ड्रायरची ऑर्डर दिली होती, पण कुरियर आलं तेव्हा तिची मैत्रीण तिथे नव्हती. महिलेने हेअर ड्रायर चालू केल्यावर त्याचा स्फोट झाला आणि महिलेचे दोन्ही हात भाजले. तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेथे तिच्या दोन्ही हाताचे तळवे कापावे लागले. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, १५ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. जखमी महिलेचे नाव बसवराजेश्वरी यरनल आहे, ती एका जवानाची पत्नी आहे. २०१७ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे बसवराजेश्वरी यांचे पती पपण्णा यरनल यांचा मृत्यू झाला.
माहितीनुसार, हा स्फोट इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटमुळे झाला. हेअर ड्रायर सारखी उपकरणं वापरण्यासाठी २-वॅटचे विद्युत कनेक्शन आवश्यक आहे. मात्र वीज त्यापेक्षा जास्त असल्याने ही दुर्घटना झाली. बसवराजेश्वरी यांचे मेहुणे शिवनगौडा यरनल यांनी सांगितलं की, शेजारी राहणाऱ्या शशिकला यांच्या नावाने कुरिअर पार्सल बुक करण्यात आलं होतं. जेव्हा कुरिअर डिलिव्हरी करणाऱ्याने शशिकला यांना पार्सल घेण्यासाठी कॉल केला तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्या शहराबाहेर आहेत आणि ते पार्सल बसवराजेश्वरी यांना देण्यास सांगितलं. शशिकला यांनी बसवराजेश्वरीला फोन केला आणि पार्सल घेण्याची विनंती केली. बसवराजेश्वरी यांनी पार्सल घेतलं.
शशिकला यांनी पार्सलमध्ये काय आहे हे पाहण्यासाठी पार्सल उघडण्यास सांगितलं, तेव्हा बसवराजेश्वरी यांनी ते उघडलं आणि त्यात हेअर ड्रायर सापडला. बसवराजेश्वरी यांनी हेअर ड्रायर पॉवर सॉकेटमध्ये लावला आणि तो चालू करताच हातात स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून काही शेजारी धावत आले आणि त्यांनी पाहिले की बसवराजेश्वरी यांच्या हाताचे तळवे आणि बोटं भाजली गेली होती. शशिकला यांनी दावा केला की, त्यांनी कोणतंही उत्पादन ऑनलाइन ऑर्डर केलं नव्हतं. एसपी म्हणाले की, इलकल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि हे उपकरण कोणी मागवलं होतं आणि ते कुठून पाठवलं होतं याचा तपास सुरू आहे.
Woman Loses Both Forearms In Hair Dryer Blast
Woman Loses Both Forearms In Hair Dryer Blast
Woman Loses Both Forearms In Hair Dryer Blast
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements