बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हरगापूरजवळ रोकड असलेली कार पळविणारी टोळी महाराष्ट्रात संकेश्वर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनी मंगळवारी परभणी येथे दरोडेखोरांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून मोठी रक्कमही जप्त करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी कोल्हापूरहून केरळकडे जाणारी कार अडवून मोठी रक्कम पळविण्यात आली होती.
सुरुवातीला दरोडेखोरांनी 3 कोटी 10 लाख रुपये पळविल्याची माहिती मिळाली होती. नेर्लीजवळ दरोडेखोरांनी पळविलेली कार आढळली. त्या कारमध्ये 1 कोटी 56 लाख 50 हजार रुपये आढळून आले होते. जिल्हा पोलीस प्रमुखांनी यासंबंधी सोमवार दि. 18 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन 1 कोटी 1 लाख रुपये जप्त करण्यात आल्याचा खुलासा केला होता. कारमधील तिघा जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.
परभणी येथे दरोडेखोरांची टोळी संकेश्वर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. माहितीनुसार आतापर्यंत एकूण 2 कोटी 90 लाख रुपये जप्त झाल्याचे समजते. प्रत्यक्षात 15 नोव्हेंबर रोजी संकेश्वर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करून 75 लाख रुपयांचा दरोडा पडल्याचे संबंधितांनी फिर्यादीत म्हटले होते. 75 लाख रुपयांचा दरोडा पडला आहे, तर गेल्या पाच दिवसांत 2 कोटी 90 लाख रुपये कुठून ताब्यात घेण्यात आले आहेत.
Belgaum police highway robbery
Belgaum police highway robbery
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements