Karnataka : Nanrendra Modi & Siddaramaiah : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकची राजधानी बंगळुरूचा दौरा केला. यावेळी मोदींनी बंगळुरूमध्ये बोईंग इंडिया इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटरच्या नव्या कॅम्पचे उद्घाटन केले. या सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैय्या हेसुद्धा उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकची राजधानी बंगळुरूचा दौरा केला. यावेळी मोदींनी बंगळुरूमध्ये बोईंग इंडिया इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटरच्या नव्या कॅम्पचे उद्घाटन केले. या सोहळ्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैय्या हेसुद्धा उपस्थित होते (Boeing Center campus in Bengaluru | ‘Aisa hota rehta hai’: PM tells Siddaramaiah as crowd chants ‘Modi, Modi’).
जेव्हा या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांनी जेव्हा मोदी मोदी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली, तेव्हा नरेंद्र मोदी यांनी सिद्धारमैय्या यांच्याकडे वळून पाहिले. मुख्यमंत्रीजी असं होतच राहतं, असं मोदी म्हणाले. त्यानंतर सिद्धारमैय्या यांनीही आपल्या डोक्याला हात लावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये अनेक विकास योजनांचं उद्घाटन केलं. त्यामध्ये बोईंग इंडिा इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या नव्या सेंटरचाही समावेश आहे. यावेळी मोदी म्हणाले की, अमेरिकेबाहेर बोईंग कंपनीची सर्वात मोठी गुंतवणूक अशा प्रकारे भारतामध्ये होत आहे. यामुळे तरुणांना नव्या संधी उपलब्ध होतील. त्यांना एव्हिएशन सेक्टरमध्ये काम करण्याची संधी मिळेल (PM Modi inaugurates Boeing Center campus in Bengaluru).
बोईंग कंपनीचा कॅम्पस ४३ एकरमध्ये पसरलेला असेल. तो उभा करण्यासाठी ₹ १६०० कोटी रुपये एवढा खर्च होईल. बोईंगचं नवं सेंटर केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ बंगळुरूच्या बाह्य भागात देवनहल्लीमध्ये बांधण्यात येत आहे. यावेळी मोदींनी सांगितले की, बोईंगचा टेक कॅम्पस बंगळुरूची प्रतिमा उजळवणार आहे. ही सुविधा जागतिक हवाई वाहतूक बाजाराला नवी शक्ती देणार आहे. भारतीय या सुविधेमध्ये भविष्यातील विमान डिझाईन करतील.
Boeing Center campus in Bengaluru
Boeing Center campus in Bengaluru
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements