त्याने घटनेचा Video शेअर केल्यानेही वाद
कर्नाटक : कारागृहात श्री रामोत्सव साजरा करण्यावरून कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना विजापूर येथे घडली. एका कैद्याने या घटनेचा व्हिडिओ शेअर केल्यानेही वाद निर्माण झाला आहे. या घटनेच्या संदर्भात महाराष्ट्रातील परमेश्वर नावाच्या आरोपीने एक व्हिडिओ व्हायरल केला आणि या व्हिडिओने वाद निर्माण केला. व्हिडिओत म्हटले आहे, की २२ तारखेला आम्ही तुरुंग अधिकाऱ्यांकडे रामाची पूजा करण्याची परवानगी मागितली. मात्र, अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. तरीही २२ जानेवारीला आम्ही विजापूर मध्यवर्ती कारागृहात रामाची पूजा केली आणि प्रसादाचे वाटप केले.
त्यानंतर २३ जानेवारी रोजी सहायक कारागृह अधीक्षक चौधरी यांनी मला आणि माझ्यासोबत पूजा करणाऱ्या दोघांना त्यांच्या चेंबरमध्ये बोलावून माझी चौकशी केली. यावेळी इतर काही आरोपींनी आमच्यावर हल्ला केला. तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आमचे संरक्षण केले नाही. उलट आम्हाला कोठडीत डांबून ठेवले आहे. याप्रकरणी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आम्हाला मदत करावी. परंतु, मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक आयजी माघेरी यांनी आरोपी रामाबद्दल खोटे बोलत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
महाराष्ट्रातील तीन आरोपी विजापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आले आहेत. महाराष्ट्राच्या कारागृहात दंगल झाल्यामुळे त्यांची येथे रवानगी करण्यात आली होती. आता ते रामाचा मुद्दा पुढे करून खोटे बोलत असल्याचे ते म्हणाले. या व्हिडिओची सत्यता तपासण्यात येत आहे. तसेच कारागृहात मोबाईल फोन कसा आला याचाही आम्ही तपास करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
Vijayapura Viral Video Jail inmate prayers to Lord Ram
Vijayapura Viral Video Jail inmate prayers to Lord Ram
Vijayapura Viral Video Jail inmate prayers to Lord Ram
Vijayapura Viral Video Jail inmate claims assault for offering prayers to Lord Ram
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements