स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव ‘या’ आजाराने ग्रस्त, जर्मनीत होणार शस्त्रक्रिया
Suryakumar Yadav sports hernia : टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि टी-20 क्रिकेटचा बादशहा असलेल्या सुर्यकुमार यादवबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सुर्यकुमार यादव याच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तीन दिवसांनी सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरूद्धचा मालिकेसाठीही तो उपलब्ध नाही. आधीच दुखापत असताना सुर्याच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झालीये. सुर्या एका आजाराने ग्रस्त असून यावर उपचार घेण्यासाठी तो परदेशी जाणार असल्याची माहिती समजत आहे. टीम इंडियाला वर्ल्डकप आणि आयपीएल तोंडावर असताना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
सुर्याला नेमकं काय झालंय? : सुर्यकुमार यादव याला हर्नियाचं निदान झाल्याची माहिती समजत आहे (sports hernia (athletic pubalgia) is not a hernia. It’s an injury to a tendon or muscle in your lower abdomen or groin that causes chronic pain). सुर्या आता बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. हर्निया आजारावर उपचार घेण्यासाठी सुर्या जर्मनीमधील म्युनिक येथे जाणार आहे. सुर्यकुमार यादव याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर रिकव्हर होण्यासाठी वेळ लागणार आहे. याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सुर्यकुमार यादव यंदाच्या आयपीएलमध्येही खेळताना दिसण्याची कमीच शक्यता आहे. आयपीएल न खेळल्यामुळे सूर्याचं वर्ल्ड कपमधील संघातील जागेवर प्रश्नचिन्ह आहे.
सुर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमधील जगातील नंबर वनचा फलंदाज आहे. टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे. कारण सुर्या टी-2O क्रिकेटमधील हुकमी एक्का आहे. गडी एकदा सेट झाल्यावर भल्याभल्या गौलंदाजांना नांगी टाकायला भाग पाडतो. आता झालेल्या आफ्रिका दौऱ्यावर सुर्याकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती.
Sports hernia injury puts Cricketer Suryakumar Yadav out of domestic season
Suryakumar Yadav sports hernia
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements