India vs Pakistan, T20 World Cup 2024 Match : India beat Pakistan by 6 runs
- India defend a record low as head-to-head reaches 7-1
- IND vs PAK : Lowest totals defended in T20 World Cup, India equal record over Pakistan in New York
- India all out for 119, records its lowest T20I first-innings score against Pakistan
- सामन्यात झाले असे 5 रेकॉड्स
- पाकिस्तानच्या जबड्यातून सामना खेचून आणला. रोमांचक विजय
- IND vs PAK, T20 World Cup 2024
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने 6 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने पाकिस्तानला 120 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र बाबर आझमच्या संघाला 20 षटकांत 7 बाद 113 धावाच करता आल्या. या सामन्यात 5 असे विक्रम झाले, ते पाहून पाकिस्तानची मान शरमेने खाली जाईल.
T20 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वात लहान लक्ष्याचा बचाव करण्याचा विक्रम :
झिम्बाब्वेच्या नावावर टी20 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वात लहान लक्ष्याचा बचाव करण्याचा विक्रम आहे. त्यांनी 2021 मध्ये 119 धावांचा बचाव केला होता. आता या यादीत भारताचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने 120 धावांचे लक्ष्य देऊन त्याचा यशस्वी बचाव केला.
T20 विश्वचषकात एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय :
T20 विश्वचषकात एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. या स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत 7 वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. T20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत कोणत्याही संघाला इतर कोणत्याही संघाने एवढ्या वेळा पराभूत केलेले नाही.
T20 विश्वचषकात सर्वात लहान लक्ष्याचा यशस्वी बचाव :
T20 विश्वचषकात सर्वात लहान लक्ष्याचा बचाव करण्यात भारताने श्रीलंकेसोबत संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले. श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध 120 धावांचा यशस्वी बचाव केला होता. आता या यादीत श्रीलंकेसह भारताचेही नाव जोडले गेले आहे. T20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताने यशस्वी बचावाच्या बाबतीत संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे.
भारतीय संघाकडून टी20 क्रिकेटमधील सर्वात लहान लक्ष्याचा यशस्वी बचाव :
भारताने टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरूद्ध सर्वात लहान लक्ष्याचा बचाव करण्याचा नवा विक्रम केला. याआधी भारताने 2016 मध्ये झिम्बाब्वे विरूद्ध टी20 मध्ये 139 धावांचा यशस्वी बचाव केला होता. तो विक्रम भारताने पाक विरूद्ध मोडला.
पाकिस्तानने टी-20 मध्ये भारताला प्रथमच ऑलआउट करूनही पराभव :
न्यूयॉर्कच्या सामन्यात पाकिस्तानने टी20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला ऑलआउट केले. याआधी टी20 मध्ये पाकिस्तानने भारताला ऑल आउट केले नव्हते. या सामन्यात पाकिस्तानला ही किमया साधता आली तरीही त्यांना पराभवाचा स्वीकार करावा लागला.
India beat Pakistan by 6 runs
India beat Pakistan by 6 runs
India beat Pakistan by 6 runs
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements