बेळगाव—belgavkar : लग्न ठरल्यानंतर वधू पळून जाण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. परंतु ऐन हळदी दिवशीच वर पळून गेल्याची घटना बेळगाव तालुक्याच्या उत्तर भागातील एका गावात घडली आहे. याची जोरदार चर्चा ग्रामीण भागात रंगली आहे. एका युवकाचे लग्न दुसऱ्या गावातील एका युवतीबरोबर निश्चित करण्यात आले होते. पंचांच्या उपस्थितीत लग्नाची तारीख ठरवण्यात आली. लग्न, हळद, साखरपुडा आदी विधींचे नियोजन करण्यात आले होते. दोन्ही घरातून लग्नाची लगबग सुरू होती.
त्या समाजातील लग्नाचा विधी हा नवरदेवाच्या घरी होता. यामुळे गुरुवारी हळदी दिवशी एक टेम्पो वधूला आणण्यासाठी सकाळी पाठवण्यात आला होता. हळदीची तयारी जोरात सुरू होती. नियोजित वधूला हळदीसाठी एका कार्यालयात आणण्यात आले. वधू दाखल झाली. सर्वत्र उत्साह होता. घरातील धार्मिक कार्यक्रम पार पडले होते. हळदीची जोरदार तयारी सुरू होती. नातेवाईक हजर होते. दारात बॅण्ड वाजत होते. इतक्यात नियोजित वर लग्नघरातून गायब झाल्याचे त्याच्या कुटुंबीयांना आढळून आले. त्यामुळे घरच्या लोकांचे धाबे दणाणले. गावात खळबळ माजली.
त्यानंतर त्या युवकाने घरच्यांना आपण आपल्या प्रेयसीबरोबर पळून जात असल्याचे मेसेज करुन कळविले. हे कळताच घरच्यांना धक्का बसला. युवकाचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न कुटुंबीयांनी, पंचांनी केला. मात्र त्याने त्याला नकार दिला. प्रेयसीबरोबर नोंदणी पद्धतीने लग्न झाल्याची माहिती त्याने दिली. यामुळे घरच्यांच्या पायाखालची वाळू घसरली. युवकाने नोंदणी पद्धतीने लग्न झालेले सर्टिफिकेट सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर युवकाच्या कुटुंबीयांनी त्या युवकाच्या लहान भावाबरोबर लग्न करण्याचा प्रस्ताव वधू समोर ठेवला. परंतु वधू पक्षाने त्याला नकार दिला. हळदी दिवशीच वरानेच पळ काढल्याने याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
Belgaum Marriage Groom Eloped Wedding Called off
Belgaum Marriage Groom Eloped
Belgaum Marriage Groom Eloped
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements