बेळगाव—belgavkar : रहदारी पोलिस खात्याने शहरातील 8 मार्गावर एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी केली आहे. एकेरी वाहतुकीचा फलक पाहूनही नो-एन्ट्रीमध्ये घुसणाऱ्या सुमारे 100 वाहनधारकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. गेल्या दोन दिवसांपासून एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यांवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे वाहनधारक नो एन्ट्रीमध्ये घुसत होते. पोलिसांनी त्यांना अडवून 500 रुपयांचा दंड केला.
गुरुवारीही वाहनधारकांकडून असाच प्रकार होणार हे लक्षात घेऊन पोलिसांनी एकेरी वाहतुकीच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहेत. यावर नो एन्ट्रीचा फलक चिकटवला असून तेथे वाहतूक पोलीसही थांबून आहेत. शहरातील गणपत गल्ली, किर्लोस्कर रोड, अन्सूरकर गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, रामदेव गल्लीसह ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून तेथून वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. शहरातील अनेक मार्गावर पूर्वीपासूनच एकेरी वाहतुकीचे फलक आहेत. परंतु, कोरोना काळात येथून ये-जा करण्यास मुभा दिली होती. कोरोना संपून 3 वर्षे उलटली तरी वाहनधारकांची सवय बदललेली नसून ते पूर्वीसारखेच एकेरी मार्गावरून दोन्हींकडून ये-जा करताना दिसतात.
त्यामुळेच वाहतूक पोलिसांनी याबाबत कारवाईची सूचना चार दिवसांपूर्वी दिली होती. प्रत्यक्ष कारवाईला दोन दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये नो एन्ट्रीमध्ये घुसणाऱ्या सुमारे 100 वाहनांवर कारवाई करून 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील वाहनधारकांनी यापुढे नो एन्ट्रीमधून वाहन नेऊ नये, असे आवाहन पोलिस खात्याने केले आहे.
one way traffic on 8 routes in Belgaum
one way traffic on 8 routes in Belgaum
one way traffic on 8 routes in Belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements