बेळगाव—belgavkar—belgaum : अल्पवयीन युवती लग्नानंतर गर्भवती राहिल्याने 25 वर्षीय मेंढपाळ संशयितावर खडकलाट पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास चालवला आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. याबाबतची अधिक माहिती अशी की, 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही गोकाक तालुक्यातील असून तिच्याशी दोन वर्षांपूर्वी बालविवाह करणारा संशयित हा चिकोडी तालुक्यातील रहिवासी आहे.
त्याचा मेंढपाळ व्यवसाय असून त्याने मुलीच्या गावात राहून तिची ओळख करून घेत तिच्याशी दोन वर्षांपूर्वी विवाह केला होता. त्यानंतर ती गर्भवती राहिल्याने निपाणी सीडीपीओ कार्यालयाच्यावतीने दिलेल्या फिर्यादीनुसार लग्न करणाऱ्या संशयितांवर बुधवारी रात्री उशिरा पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सीपीआय बी. एस. तळवार हे करीत आहेत.
संशयित चिकोडी तालुक्यातील फरार पतीला खडकलाट पोलिसांनी अटक केली. दरम्यान, त्याला बेळगावच्या विशेष न्यायालयासमोर गुरुवारी हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी हिंडलगा केल्याची माहिती सीपीआय बी. एस. तळवार यांनी दिली.
Belgaum Marriage to a minor girl Khadaklat
Belgaum Marriage to a minor girl Khadaklat
Belgaum Marriage to a minor girl Khadaklat
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements