टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं
टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. अमेरिका वेस्ट इंडिजमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. त्यामुळे या स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. 14 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आयसीसी इव्हेंट वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. यापूर्वी 2010 मध्ये येथे वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्डकप स्पर्धेत काही गोष्टी पहिल्यांदाच होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. काही टीम पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप खेळत आहेत. तर काही नियम पहिल्यांदाच लागू होत आहेत. पण नेमके कोणते नियम आणि काय बदल झाला आहे, असे काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर प्रत्येक प्रश्नांचं उत्तर जाणून घ्या.
वर्ल्डकप कधी सुरु होणार आणि कधीपर्यंत? : टी20 वर्ल्डकप स्पर्धेला भारतीय वेळेनुसार 2 जूनला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. हा सामना सकाळी 6 वाजता सुरु होईल. तर या स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना 29 जूनला होणार आहे.
वर्ल्डकप स्पर्धेत एकूण किती संघ? : टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 20 संघ भाग घेणार आहे. अमेरिकेत स्पर्धा असल्याने त्या संघाला स्पर्धेत स्थान मिळालं आहे. कॅनडा, युगांडा पहिल्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळणार आहेत. तसेच भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेपाळ, दक्षिण अफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, नेदरलँड, स्कॉटलँड, आयर्लंड, पापुआ न्यू गिनी, वेस्ट इंडिज, नामिबिया, अफगाणिस्तान आणि ओमान या स्पर्धेत आहेत.
वर्ल्डकप स्पर्धेचा फॉर्मेट कसा आहे? : वर्ल्डकप स्पर्धेत साखळी फेरी आणि सुपर 8 फॉर्मेट आहे. 20 संघांची विभागणी 5-5 च्या 4 गटात केली आहे. प्रत्येक गटातून आघाडीचे 2 संघ सुपर 8 फेरीत खेळतील. तेथे 4-4 चे दोन ग्रुप असतील. सुपर 8 मधील 2-2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि अंतिम सामना होईल.
सामना बरोबरीत सुटला तर निकाल कसा लागेल? : स्पर्धेतील एखादा सामना बरोबरीत सुटला तर त्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये होईल. सुपर ओव्हरमध्येही टाय झाला तर परत-परत सुपर ओव्हर निकाल लागेपर्यंत होईल. एक तासाचा अतिरिक्त वेळ संपपर्यंत सुपर ओव्हर चालेल. तरीही निकाल लागला नाही तर साखळी आणि सुपर 8 फेरीत दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला जाईल. जर उपांत्य फेरीत अशी स्थिती उद्भवली तर सुपर 8 फेरीत टॉपला असलेल्या संघाला पुढे संधी मिळेल.
पावसाचा व्यत्यय आला तर कसा होईल सामना? : टी20 नियमानुसार, कोणत्याही सामन्याचा निकाल देण्यासाठी कमीत कमी 5 षटकं होणं गरजेचं आहे. साखळी फेरी आणि सुपर 8 फेरीत हा नियम लागू असेल. सामना झालाच नाही तर गुण वाटून दिले जातील. पण उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी नियम वेगळा असेल.
उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत कसा निर्णय असेल? : उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा निकाल देण्यासाठी कमीत कमी 10-10 षटकं होणं गरजेचं आहे. जर तसं झालं नाही तर उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस आहे. त्यामुळे सामना दुसऱ्या दिवशी होईल. पण दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात असं होणार नाही. कारण एका दिवसाच्या अंतराने अंतिम सामना असेल. त्यामुळे राखीव दिवस नाही. पण त्याच दिवशी सामना संपवण्यासाटी 4 तास 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. पण तरीही निकाल लागला नाही. सुपर 8 मधील आघाडीच्या संघाला अंतिम फेरीत स्थान मिळेल. अंतिम फेरीसाठी 30 जून हा राखीव दिवस आहे. जर सामना झाला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केलं जाईल.
वर्ल्डकप स्पर्धेत हा नियम पहिल्यांदाच असणार : वर्ल्डकप स्पर्धेत एक नियम नव्याने असणार आहे. स्पर्धा वेगाने पूर्ण होण्यासाठी स्टॉप क्लॉक हा नियम असणार आहे. यात एक षटक संपल्यानंतर दुसरं षटक सुरु करण्यासाठी अवघ्या 60 सेकंदाचा अवधी असेल. जर असं झालं नाही तर दोन वेळा वॉर्निंग दिली जाईल. पुन्हा तसंच केलं तर मात्र 5 धावा पेनल्टी म्हणून दिल्या जातील.
वर्ल्डकप स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार? : अमेरिकेत न्यूयॉर्क, डलास आणि लॉडरहिलमध्ये साखळी फेरीतील सामने होतील. वेस्ट इंडिजमध्ये ब्रिजटाउन, प्रोविडेंस, नॉर्थ साउंड, ग्रोस आयलेट, किंग्सटन आणि टारोबामध्ये ग्रुप स्टेज, सुपर 8, सेमीफायनल आणि अंतिम सामना खेळला जाईल. अंतिम सामना ब्रिजटाउनमध्ये खेळला जाईल.
टी20 वर्ल्डकप स्पर्धा कुठे पाहता येईल : भारतात टी20 वर्ल्डकप स्पर्धा अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. ऑनलाईन स्ट्रीमिंगसाठी डिजनी हॉटस्टारवर पाहता येईल.
टीम इंडियाच्या गटात कोणते संघ आहेत? : भारत गट अ मध्ये असून यात अमेरिका, पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा हे देश आहेत. टीम इंडियाचे ग्रुप स्टेज सामना भारतीय वेळेनुसार खेळले जातील.
All to know about the T20 World Cup 2024
All to know about the T20 World Cup 2024
All to know about the T20 World Cup 2024
All to know about the T20 World Cup 2024
All to know about the T20 World Cup 2024
All to know about the T20 World Cup 2024
All to know about the T20 World Cup 2024
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements