बेळगाव-belgavkar : शिवबसवनगर येथील एका हॉलमध्ये विवाह समारंभात फोटो काढणाऱ्या छायाचित्रकाराचे अपहरण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. उमेश बसप्पा होसूर (वय ३१, रा. हिट्टनगी ता. सौंदत्ती सध्या रा. मुरकभावी ता. बैलहोंगल) असे अपहृत छायाचित्रकाराचे नाव असून त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार माळमारुती पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेत शनिवारी ८ अपहरणकर्त्यांना अटक केली आहे.
बसवराज निरूपक्षी नरट्टी (वय ४२, रा. सौंदत्ती रोड बेळवडी ता. बैलहोंगल), प्रदीप मारुती उमराणी (वय २६, रा. सौंदत्ती रोड बेळवडी ता. बैलहोंगल), विकास उर्फ विकी सुरेश पत्तार (वय १९, रा. संगमनगर, गोकाक), ओंकार विजय घोरपडे (वय १८, रा. गोकाक), किरण परसाप्पा मुरकीभावी (वय ३२, रा. संगमनगर,गोकाक), मल्लनगौड बसनगौड पाटील (वय २०, रा. संगमनगर गोकाक), तारा श्रीकांत कमती (वय ४०, रा. सुनधोळी, ता. मुडलगी आणि धनलक्ष्मी बसवराज नरट्टी (वय ३७, रा. सौंदत्ती रोड, बेळवडी ता. बैलहोंगल) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणातील फिर्यादी पहिला संशयित बसवराजकडे कामाला होता. तसेच त्यांच्या घरातील कामेदेखील तो करत होता. मात्र, वर्षभरापूर्वी झालेल्या भांडणातून उमेशने त्यांच्याकडील काम सोडून स्वतःचा स्टुडीओ सुरू केला होता. बसवराजने उमेशच्या नावे एका फायनान्समध्ये खाते उघडून १२० ग्रॅम सोने तारण ठेवून त्यावर कर्ज घेतले होते. त्यांचे घरकाम सोडून गेल्यानंतर बसवराज उमेशला वारंवार फोन करून बँकेतील सोने सोडवून दे अशी मागणी करत होता.
त्यावर तुझ्याकडे मी १२ वर्षे काम केले आहे पहिल्यांदा त्याचे पैसे दे अशी मागणी उमेश करत होता. आठ महिन्यांपूर्वी बसवराजसह अन्य काही जणांनी उमेशचे अपहरण करून एका फायनान्स कंपनीत नेऊन त्याच्याकडून सह्या करून घेतल्या होत्या. त्यानंतर शनिवारी उमेश हा शिवबसवनगर येथील KPTCS हॉलमध्ये एका लग्न समारंभात फोटोग्राफी करण्यासाठी आला होता. त्यावेळी संशयितांनी उमेशला हॉलच्या बाहेरून अपहरण करत कारमध्ये कोंबले. त्यानंतर त्याला मारहाण करून बैलहोंगल पोलिस ठाण्यानजीक सोडून दिले. रात्री ११.३० च्या दरम्यान उमेश जिल्हा रुग्णालय दाखल झाला. उमेशने माळमारुती पोलिस ठाणे गाठून आपले अपहरण करून खुनाचा प्रयत्न केल्याची फिर्याद दिल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेऊन वरील आठ संशयितांना अटक केली आहे. याप्रकरणी माळमारुतीचे पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची तपास करत आहेत.
Kidnapping of photographer 8 arrested belgaum
Kidnapping of photographer 8 arrested belgaum
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements