कर्नाटकमधून राज्यसभेची जागा दिली जाऊ शकते
कर्नाटक : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेससह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यातच आता काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना कर्नाटक राज्यातून राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते, असा दावा केल्यानंतर कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी ते वृत्त फेटाळून लावले. सोनिया गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार (Loksabha) नाहीत आणि त्यांना कर्नाटकमधून राज्यसभेची जागा दिली जाऊ शकते, असे वृत्त प्रसिद्धी माध्यमातून आले होते.
Will Sonia Gandhi take the Rajya Sabha route to Parliament? : त्यावर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, ही सर्व माहिती खोटी आहे. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. सोनिया गांधी यांनी 1999 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील बळ्ळारी येथून भाजपच्या दिवंगत नेत्या दिवंगत सुष्मा स्वराज यांचा पराभव केला होता. सोनिया गांधींनी रायबरेलीची जागा सोडली तर त्यांची मुलगी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या जागेवरून निवडणूक लढवू शकतात. विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी अलीकडेच प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवण्याचे आवाहन केले होते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यापूर्वी राहुल गांधी या मतदारसंघातून तीनदा खासदार झाले आहेत. राहुल गांधी यावेळी अमेठीतून निवडणूक लढवणार की नाही, याबाबत काँग्रेसने अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. सध्या राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून खासदार आहेत. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. पण, इंडिया आघाडीचा भाग असलेल्या डाव्यांनी वायनाड जागेवर दावा केला आहे. पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे असेल.
Sonia Gandhi Rajya Sabha Karnataka
Sonia Gandhi Rajya Sabha Karnataka
Sonia Gandhi Rajya Sabha Karnataka
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements