सूर्यकुमारचा रेकॉर्ड ब्रेक
India vs Afghanistan 3rd T20i
कर्नाटक-बंगळुरु India vs Afghanistan, 3rd T20I : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये (IND vs AFG, 3rd T20I Chinnaswamy Stadium in Bangalore) अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी20 सामन्यात विस्फोटक खेळी करत शतक ठोकलं आहे. रोहितच्या टी20 कारकीर्दीतील हे पाचवं शतक ठरलं आहे. रोहित यासह या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
India vs Afghanistan Live Score, 3rd T20I
रोहित शर्माने (Rohit Sharma) कॅप्टन्स इनिंग्स करताना भारताचा डाव सावरला. सोबतीला रिंकू सिंग (Rinku Singh) उभा राहिला आणि 4 बाद 22 धावांवरून भारताने मोठा पल्ला गाठला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करून विराट कोहली व हार्दिक पांड्या यांचा (113 धावा वि. पाकिस्तान, 2022) विक्रम मोडला. विराटने 64 चेंडूंत 103 धावा करून ट्वेंटी-20तील पाचवे शतक झळकावले आणि जगात असा पराक्रम करणारा पहिला फलंदाज ठरला. त्याचवेळी त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त सर्वाधिक 87 षटकारांचा विक्रमही नावावर केला. इंग्लंडच्या इयॉन मॉर्गनचा (86) विक्रम त्याने मोडला. रोहितने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20तील पाचवे शतक झळकावले आणि सूर्यकुमार यादव (4) व ग्लेन मॅक्सवेल (4) यांना मागे टाकले (Rohit Sharma smashes record 5th T20I century).
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय संघाच्या अंगाशी आल्याचे दिसले. यशस्वी जैस्वाल (4) व विराट कोहली (0) हे सलग दोन चेंडूंवर माघारी परतले. शिवम दुबे (1) आज अपयशी ठरला. संजू सॅमसनला (0) संधीचं सोनं करण्यात पुन्हा अपयश आले. रोहित शर्मा दुसऱ्या बाजूने मैदानावर उभा राहिला आणि रिंकू सिंगला आज मोठी खेळी करण्याची संधी मिळाली. रोहितने अर्धशतकी खेळी करून विराट कोहलीचा मोठा विक्रम आज मोडला. भारतीय कर्णधार म्हणून ट्वेंटी-20त सर्वाधिक 1570 धावांचा विराटचा विक्रम आज रोहितने मोडला. शिवाय त्याने कर्णधार म्हणून ट्वेंटी-20त 13 वेळा फिफ्टी प्लस धावा करून विराटशी बरोबरी केली.
12 व्या षटकापासून रोहितने हात मोकळे करण्यास सुरुवात केली आणि एकामागून एक विक्रमांचा पाऊस पाडला. ट्वेंटी-20त भारताकडून सर्वाधिक धावा करणारा कर्णधार तो ठरला. त्याने विराटचा (1570) विक्रम मोडला. रिंकूनेही षटकाराने अर्धशतक पूर्ण केले. रोहितचे कर्णधार म्हणून हे ट्वेंटी-20ती तिसरे शतक ठऱले आणि त्याने बाबर आजमशी बरोबरी केली. रोहितने 69 चेंडूंत 11 चौकार व 8 षटकारांसह नाबाद 121 धावा केल्या, तर रिंकूनेही 39 चेंडूंत 2 चौकार व 6 षटकारांसह नाबाद 69 धावांची वादळी खेळी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी करताना संघाला 4 बाद 212 धावांपर्यंत पोहोचवले.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खान.
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शरफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि फरीद अहमद मलिक.
Rohit Sharma smashes record 5th T20I century
Rohit Sharma smashes record 5th T20I century
Rohit Sharma smashes record 5th T20I century
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements