Parliament Budget Session
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार होते, मात्र अधिवेशनाचा कालावधी एका दिवसासाठी वाढवण्यात आला. आता अधिवेशन 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या शेवटच्या दिवशी काहीतरी मोठी घडामोड घडू शकते, असे मानले जात आहे. याचे कारण म्हणजे, भाजपने आपल्या सर्व सदस्यांना व्हीप जारी करुन 10 फेब्रुवारी रोजी सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
माहितीनुसार, भाजपने लोकसभा आणि राज्यसभेतील आपल्या सर्व सदस्यांना उद्या, म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा किंवा निर्णय होऊ शकतो. भाजपचे राज्यसभेतील मुख्य व्हीप लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी पक्षाच्या खासदारांना 3 ओळींचा व्हिप जारी केला आहे.
BJP issues three line whip to all its MPs of Lok Sabha and Rajya Sabha, asking them to be present in the house on 10th February as some important legislative business is to be discussed in both Houses.
— ANI (@ANI) February 9, 2024
लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजपच्या सर्व राज्यसभा खासदारांना सूचित करण्यात येते की, शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यसभेत काही अत्यंत महत्त्वाचे कामकाज होणार आहे. त्यामुळे भाजपच्या सर्व सदस्यांनी शनिवारी दिवसभर सभागृहात उपस्थित राहून सरकारला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Parliament Budget Session BJP issued whip to MPs
Parliament Budget Session BJP issued whip to MPs
Parliament Budget Session BJP issued whip to MPs
Parliament Budget Session BJP issued whip to MPs
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements