कर्नाटक : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना त्रासदायक ठरलेल्या मुडा घोटाळ्याने, आता धजद आमदार जी. टी. देवेगौडा यांना घेरण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्यावर बनावट कागदपत्र तयार करून त्यांच्या नातेवाइकांना १९ भूखंड वाटप केल्याचा आरोप आहे.
याआधी म्हैसूर दसरा कार्यक्रमात मुडा घोटाळ्याप्रकरणी राजीनामा का द्यायचा, असा सवाल करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मागे उभे राहिलेले जी. टी. देवेगौडा यांचीही अडचण सुरू झाली आहे. त्यांच्या बहिणीचा मुलगा महेंद्र यांच्याकडे १९ भूखंड असल्याचा गंभीर आरोप सिद्धरामय्या यांच्याविरोधात तक्रार करणारे सामाजिक कार्यकर्ते स्नेहमयी कृष्णा यांनी केला आहे. जी. टी. देवेगौडा यांनी या प्रक्रियेत त्यांचा प्रभाव वापरल्याचा आरोपही त्यांनी केला.काय आहे आरोप ?
देवनूर गावातील महेंद्राच्या मालकीची २.२२ एकर जमीन त्यांनी वापरली आहे. मात्र ही जमीन कधी संपादित करून विकसित करण्यात आली याबाबत माहिती नाही. त्याशिवाय देवनूर गावाची जमीन तिसऱ्या टप्प्यात देण्यात आली आहे. त्यांनी प्रोत्साहन योजनेत स्वेच्छेने सोडून दिल्याचे खरेदीपत्रात नमूद केले आहे. या जागेसाठी फक्त ४००६० आणि ४००३० फुटांचे दोन भूखंड (एकूण ३,६०० चौरस फूट क्षेत्रफळ) द्यायला हवे होते.
मात्र, शहरातील प्रमुख ठिकाण असलेल्या विजयनगरमध्ये १९ भूखंड देऊन त्याची भरपाई केली आहे. तसेच ही जमीन मुडाच्या ताब्यात कधी आली, हे स्पष्ट झालेले नाही. या जागेचा मूळ मालक महेंद्र नाही. बनावट कागदपत्रे तयार करून बेकायदेशीर सेटलमेंट करून जमीन मिळवली, असा आरोप त्यांनी केला आहे.
Snehamayi Krishna On GT Devegowda Kin In MUDA
Snehamayi Krishna On GT Devegowda Kin In MUDA
Snehamayi Krishna On GT Devegowda Kin In MUDA
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements