Mohammed Shami undergoes successful surgery
Mohammed Shami undergoes successful heel operation in UK : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शामी (Mohammed Shami) याच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. दुखापतीमुळे तो विश्वचषकापासून भारतीय संघाबाहेर होता. विश्वचषकादरम्यान दुखापत असतानाही शामी यानं भेदक मारा केला होता. पण त्यानंतर त्याची दुखापत जास्तच बळावली. एनसीएमध्येही (NCA) उपचार घेतले, पण काही फरक पडला नाही. त्यामुळे अखेर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. युकेमध्ये मोहम्मद शामी याच्या पायावरील सर्जरी (Shami undergoes surgery for Achilles tendon) यशस्वी झाली आहे. शामीनं एक्सवर पोस्ट शेअर करत सर्जरी यशस्वी झाल्याची माहिती दिली.
Mohammed Shami undergoes successful surgery : मोहम्मद शामी यानं सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो हॉस्पिटलमधील आहेत. कॅप्शनमध्ये शामीनं म्हटलेय की, आताच माझ्या घोट्याचं यशस्वी ऑपरेशन झालं. सर्वकाही सध्या ठीक आहे. मला सावरण्यासाठी वेळ लागेल. लवकरच पायावर उभं राहील. Mohammed Shami, who has been out of competitive cricket since the World Cup in November, underwent surgery in London on Monday. The operation targeted his Achilles tendon, a part that has been bothering him since the World Cup. Shami mentioned that the recovery process will take some time, expressing hope to resume his cricketing journey soon. He shared this update through a social media post along with a picture of himself.
दरम्यान, मोहम्मद शामीच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो मागील चार महिन्यापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. शामीला दुखापतीमधून सावरण्यासाठी वेळ लागणार आहे. तो आयपीएल 2024 ला मुकणार आहे. शामीच्या दुखापतीचा फटका गुजरात संघालाही बसणार आहे. त्याशिवाय टी20 विश्वचषकालाही मुकण्याची शक्यता आहे.
मोहम्मद शामीनं नोव्हेंबर 2023 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. वनडे विश्वचषकाचा अंतिम सामन्यात शामी खेळला होता. हा सामना ऑस्ट्रेलियानं 6 विकेटनं जिंकला होता. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल ऑस्ट्रेलियानं 4 विकेटच्या मोबदल्यात 43 षटकात हे आव्हान पार केले होते. भारताकडून मोहम्मद शामीनं एक विकेट घेतली होती. वनडे विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम मोहम्मद शामी यानं केला होता. शामीनं 7 सामन्यात 24 विकेट घेतल्या.
वनडे विश्वचषकानंतर मोहम्मद शामी दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. दुखापत असतानाही मोहम्मद शामी यानं भारतासाठी विश्वचषक गाजवला होता. सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेलाही तो मुकलाय. मोहम्मद शामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करण्याची शक्यता आहे.
Mohammed Shami undergoes successful surgery
Mohammed Shami undergoes successful surgery
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements