बेळगाव—belgavkar—belgaum : सांबरा विमानतळाच्या भिंतीला लागूनच असलेल्या होन्निहाळजवळ खून झालेल्या अनोळखी युवकाची ओळख पटली असून तो श्रीनगर येथील राहणारा होता. व्यवसायाने तो कारचालक होता, अशी माहिती मिळाली आहे. मात्र या तरुणाचा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही.
निंगनगौडा शिवनगौडा सन्नगौडर (वय २७, मूळचा रा. अलदकट्टी, ता. सौंदत्ती व सध्या रा. श्रीनगर) असे त्या तरुणाचे नाव आहे. मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर उत्तरीय तपासणीची प्रक्रियापूर्ण करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मारिहाळचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी पुढील तपास करीत आहेत.
१८ नोव्हेंबर रोजी सकाळी होन्निहाळ येथील शेतवडीत निंगनगौडाचा मृतदेह आढळून आला होता. सिमेंटच्या विटांनी डोक्यावर हल्ला करून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले होते. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त रोहन जगदीश आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. होन्निहाळ येथे आढळून आलेल्या मृतदेहाची छायाचित्रे सर्व पोलीस स्थानकांना पाठविण्यात आली होती. सोमवारी रात्री श्रीनगर येथील निंगनगौडाचे कुटुंबीय तो बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल करण्यासाठी माळमारुती पोलीस स्थानकात पोहोचले. त्यावेळी माळमारुती पोलिसांनी होन्निहाळ येथे आढळलेल्या मृतदेहाची छायाचित्रे कुटुंबीयांना दाखविली. त्यामुळे त्याची ओळख पटली.
निंगनगौडा व्यवसायाने कारचालक होता. रविवार दि. १७ नोव्हेंबर रोजी आपण काम करीत असलेल्या मालकांना देवदर्शनासाठी कारमधून त्याने सौंदत्तीला नेले होते. सौंदत्तीहून बेळगावला येताना दुपारी यरगट्टी येथे निंगनगौडा कारमधून उतरला. यरगट्टीहून जवळच असलेल्या अलदकट्टी या आपल्या गावी जाऊन येण्याचे सांगितले होते. गावात कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर बेळगावला येण्यासाठी त्याने यरगट्टी येथे बस पकडली होती. मात्र तो बेळगावला पोहोचला नाही. होन्निहाळजवळ दुसऱ्या दिवशी सोमवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी खून झालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. मारिहाळ पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
belgaum youth murder near airport
belgaum youth murder near airport
belgaum youth murder near airport
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements