बेळगाव : तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्याच्या आत्महत्येला मंगळवारी १५ दिवस पूर्ण झाले. अद्याप या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला नाही. तोच त्या अधिकाऱ्याने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाल्याचे पत्र तपास अधिकाऱ्यांना आले आहे. यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.
रुद्राण्णा यडवण्णवर (वय ३४) या अधिकाऱ्याने तहसीलदार कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी घडली होती. यासंबंधी तहसीलदारांसह तिघा जणांविरुद्ध एफआयआर दाखलकरण्यात आले होते. रुद्राण्णाच्या आत्महत्येला हे तिघेजण कारणीभूत असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता.
तहसीलदारांच्या वाहनचालकाची चौकशी करण्याची मागणी : आता या प्रकरणाचे तपास अधिकारी असलेल्या खडेबाजार एसीपी कार्यालयाला एक पत्र आले आहे. रुद्राण्णाने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून झाला आहे. तहसीलदारांच्या वाहनचालकाची चौकशी करा, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. या पत्राच्या प्रति जिल्हाधिकारी, प्रादेशिक आयुक्त, राज्यपाल व मानव हक्क आयोगालाही पाठविण्यात आल्या आहेत.
तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी फरारी असलेल्या तहसीलदारांसह तिघा जणांना गुरुवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
clerk commit suicide belgaum
clerk commit suicide belgaum
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements