त्या शाळेत कन्नड शिक्षण घेणाऱ्यांना राखीवता
बेळगाव—belgavkar : कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील 865 गावांमध्ये महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना लागू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राने कर्नाटकात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये. आमच्या राज्याच्या मुख्य सचिवांनी त्याबाबत अधिक महाराष्ट्र सरकारला कळविले. त्यामुळे महाराष्ट्राने कर्नाटकात आपल्या कोणत्याही योजना आणू नयेत, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला आहे (Maharashtra told not to implement its health scheme in Karnataka’s boundary villages: CM Siddaramaiah)
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथे संगोळी रायण्णा सैनिक शाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते आले असता पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्रातील योजनांबाबत छेडले असता महाराष्ट्र सरकारच्या हालचालीवर कर्नाटक सरकार लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्राने कर्नाटकात हस्तक्षेप करू नये, असे सांगितले. राज्यात कन्नडचा सर्वत्र वापर केला जात असून, कन्नड शिक्षण घेणाऱ्यांना राखीवता देखील दिली जात आहे. संगोळी रायण्णा सैनिक शाळेत देखील कन्नड विद्यार्थ्यांसाठी 65 टक्के आणि इतरांसाठी टक्के 35 जागा राखीव ठेवण्याची कार्यवाही केली आहे. तेथे दर्जेदार शिक्षण घेऊन मुलांमध्ये देशभक्ती रुजवली जाईल. येथे शिकणाऱ्यांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळते. त्यासाठीच कन्नड विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे, असेही सिद्धरामय्या यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राने सीमावर्तीय 865 गावांमध्ये सुरू केलेल्या योजनामुळे कर्नाटकाची पोटदुखी वाढली आहे. त्यामुळे यापूर्वीच या योजना महाराष्ट्राने कर्नाटकात लागू करू नये, यासाठी कर्नाटकचे प्रयत्न सुरू झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या रुग्णालयांमध्ये योजना सुरू केली जाणार होती, त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी देखील महाराष्ट्राने या योजना कर्नाटकात लागू करू नयेत, असे बजावले आहे.
Maharashtra govt officials should not enter Karnataka CM Siddaramaiah
Maharashtra health scheme in Karnataka
Maharashtra health scheme in Karnataka
Maharashtra health scheme in Karnataka
Belgaum belgav belagavi belgavkar
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements