तर काँग्रेसच्या हमी योजना रद्द केल्या जातील
कर्नाटक—belgavkar : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान केले नाही, तर हमी योजना रद्द केल्या जातील, असा धमकीवजा इशारा काँग्रेसचे रामनगर जिल्ह्यातील मागडीचे आमदार एच. सी. बालकृष्ण यांनी दिला आहे. त्यामुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले असून, तातडीने मुख्यमंत्र्यांना तसे काही होणार नसल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले (Karnataka government can end 5 guarantees if more Congress MPs are not elected, claims MLA H C Balakrishna).
मागडी तालुक्यातील श्रीगिरीपूर येथे आ. बालकृष्ण यांनी जनसंपर्क सभा आयोजित केली होती. या सभेत खासदार डी. के. सुरेश यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, काँग्रेसने निवडणुकीआधी 5 हमी योजनांचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सर्व पाच योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. महिलांना मोफत बस प्रवास करण्याची मुभा आहे. लोकांना आता वीज बिल भरण्याची आठवणही नाही. महिलांना मासिक ₹ 2000 रुपये मिळत आहेत. बेरोजगारांना भत्ता दिला जात आहे. एवढे सगळे करूनही काँग्रेसला मतदान केले नाही तर हमी योजनांचा उपयोगच होणार नाही. निवडणुकीत काँग्रेसची हार झाल्यास हमी योजना रद्द केल्या जातील.
आ. बालकृष्ण पुढे म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशीही चर्चा केली आहे. लोकांनी मत दिले नाही तर त्यांना हमी योजना नको असाच संदेश जातो. त्यामळे काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या तर हमी योजना सुरुच राहतील. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून संपूर्ण राज्यात याबाबत चर्चा सुरु झाली आहे. भाजपने याबाबत टीका केली असून मतदारांना थेट ब्लॅकमेल करण्याचा हा प्रकार असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसकडून ब्लॅकमेल राजकारण सुरू आहे. हमी योजनांच्या बदल्यात लोकसभा निवडणुकीसाठी मते मागितली जात आहेत. विविध खात्यांसाठीचा निधी हमी योजनांसाठी वापरला जात आहे. निवडणुकीत मतदारच काँग्रेसला त्यांची योग्य जागा दाखवतील.
– बी. वाय. विजयेंद्र, प्रदेशाध्यक्ष, भाजप
राज्य सरकारचा कार्यकाळ असेपर्यंत हमी योजना सुरूच राहतील. योजना बंद करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. गरिबांसाठीच्या या योजना असून त्या कायम राहतील. – सिद्धरामय्या, मुख्यमंत्री
Karnataka govt can end 5 guarantees Congress MLA belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india
Karnataka govt can end 5 guarantees Congress MLA. Karnataka govt can end 5 guarantees Congress MLA
Karnataka govt can end 5 guarantees Congress MLA
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements