Karnataka Govt announces holiday calendar for 2025
बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारने गुरुवारी २०२५ मधील सरकारी सुट्यांची यादी जाहीर केली. त्यात विविध सणांसह २०२५ मध्ये एकूण १९ दिवसांच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात जास्त सुट्या आहेत.
राज्य सरकारने सन २०२५ च्या सार्वजनिक सुट्यांची यादी आज जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली. त्यामध्ये एकूण १९ दिवसांच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रजासत्ताक दिन (रविवार, २६ जानेवारी), गुढी पाडवा (रविवार, ३० मार्च), मोहरम दिवस (६ जून), महालय आमावस्या (रविवार, २१ सप्टेंबर) आणि दुसऱ्या शनिवारी येणारी कनकदास जयंती (८ नोव्हेंबर) यांचा या यादीत उल्लेख नाही. मुस्लिम बांधवांचे सण विहित तारखेला येत नसल्यास, सरकारी सेवेत असलेल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना विहित रजेच्या बदल्यात सणाच्या दिवशी सुटी दिली जाऊ शकते.
सरकारी सुट्या अशा : १४ जानेवारी मकर संक्रांती, फेब्रुवारी- महाशिवरात्री, मार्च- कुतुब-ए-रमजान, २६ ३१, १० एप्रिल- महावीर जयंती, १४ एप्रिल- डॉ. बी. आर. आंबेडकर जयंती, १८ एप्रिल गुड फ्रायडे, ३० एप्रिल- बसव जयंती, अक्षय तृतीया,
१ मे कामगार दिन, ७ जून बकरी ईद, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, २७ ऑगस्ट वरसिद्धी विनायक व्रत, ५ सप्टेंबर ईद मिलाद, १ ऑक्टोबर- विजयादशमी, २ ऑक्टोबर गांधी जयंती, ७ ऑक्टोबर वाल्मीकी जयंती, २० ऑक्टोबर नरक चतुर्थी,
२२ ऑक्टोबर- बलिप्रदिपदा, दिवाळी, १ नोव्हेंबर राज्योत्सव, २५ डिसेंबर नाताळ
Karnataka Govt announces holiday calendar for 2025
Karnataka Govt announces holiday calendar for 2025
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements