तब्बल 92 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
SA vs IND, 2nd Test Day 2 : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाने 7 विकेटने विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या घातक माऱ्यासमोर आफ्रिकन फलंदाजांचा निभाव लागला नाही. पहिल्या डावात 55 तर दुसऱ्या डावात 176 वर आफ्रिकेचा डाव आटोपला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज याच्या भेदक माऱ्यासमोर यजमानांनी नांगी टाकली. अवघ्या दीड दिवसात कसोटी सामन्याचा निकाला लागल आहे. हा सामना कसोटी इतिहासातील सर्वात कमी बॉल खेळला गेलेला सामना ठरला आहे.
Newlands Cricket Ground in Cape Town वर पार पडलेल्या सामन्याची इतिहासात नोंद झाली आहे. कसोटीमधील 92 वर्षांचा इतिहास मोडला गेलाय. टीम इंडियाने या सामन्यात 7 विकेटने विजय मिळवला आहे. मोहम्मद सिराज याला या सामन्यात सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
1932 साली मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेला सामना सर्वात कमी बॉल्सचा ठरला होता. 656 बॉल्मध्ये हा सामना आटोपला होता. ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि 72 धावांनी विजय मिळवला होता.
1935 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये झालेला सामना 672 बॉल्सचा झाला होता. यामध्ये इंग्लंड संघाने 4 विकेटने विजय मिळवला होता. हा कसोटीमधील कमी बॉल्सचा दुसरा सामना ठरला होता.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये 1988 मध्ये झालेला सामना 788 बॉल्सचा झाला होता. मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात इंग्लंड संघ एक डाव आणि 21 धावांनी जिंकला होता.
1888 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेला सामना 792 बॉल्सचा झाला होता. लॉर्ड्सवर पार पडलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 61 धावांनी विजय मिळवला होता.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements