कर्नाटक—बेंगळूरु (hoax bomb threat karnataka) : येथील विश्वेश्वरय्या संग्रहालय, नेहरू तारांगण आणि विजापूर जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध गोलघुमटसह देशातील २० संग्रहालयांना बॉम्बची धमकी मिळाल्याने गोंधळ उडाला आहे. बंगळूरमधील खासगी शाळांना बॉम्बच्या धमक्यांबाबत अलीकडेच आलेल्या ई-मेल संदेशांनंतर आता संग्रहालयांमध्येही बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत, त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
गोलघुमटमध्ये बाँब ठेवल्याची धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेत तपास केला (Gol Gumbaz Museum in Karnataka receives hoax bomb threat). नंतर पोलिसांनी पुष्टी केली की, ही बॉम्बची खोटी धमकी होती. बॉम्ब निकामी पथकाने रात्रीउशिरा संपूर्ण संग्रहालयाची झडती घेतली. मात्र, बॉम्ब सापडला नाही. दहशतवाद्यांच्या नावाने ई-मेल संदेश पाठवण्यात आला होता. याबाबतची माहिती मिळालेल्या पोलिसांना गोलघुमट पोलिस ठाण्याचे मल्लया मठपती यांनी सांगितले की, पुढील तपास सुरू आहे.
दुसरीकडे कनिंगहॅम रोडवरील नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये बॉम्बची धमकी मिळाल्याने काही काळ घबराट होती. या पार्श्वभूमीवर बंगळूर स्टॉक एक्सचेंजमध्येही बॉम्ब ठेवण्यात आल्याचे धमकीचे फोन आले आहेत.
विश्वेश्वरय्या संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संग्रहालयात येऊन तपास केला. बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकही तपासणीत सहभागी झाले होते. पडताळणी केल्यानंतर ही बनावट धमकी असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी कब्बन पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सविस्तर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पुरातत्व आणि प्राच्य वारसा विभागाला संग्रहालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे.
hoax bomb threat karnataka
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements