26 व 27 डिसेंबर रोजी बेळगावात काँग्रेस अधिवेशन भरविण्याचा निर्णयही
बेळगाव @कर्नाटक : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात होणार आहे. 9 ते 20 डिसेंबर या कालावधीत बेळगावमधील सुवर्णसौध येथे अधिवेशन भरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
अधिवेशन बोलावण्यासंबंधी कायदा आणि संसदीय कामकाज मंत्रालयाने राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. राज्यपालांकडून यासंबंधी अधिकृत आदेश जारी होणार आहे.
अलीकडेच विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर आणि विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी सुवर्णसौधला भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. शिवाय हिवाळी अधिवेशनासंबंधी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दि. 26 व 27 डिसेंबर 1924 रोजी बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेसच्या 39 व्या अधिवेशनाला यंदा 100 वर्षे पूर्ण होत असल्याने 26 व 27 डिसेंबर रोजी बेळगावात काँग्रेस अधिवेशन भरविण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचे समजते.
winter session of the state legislature belgaum
winter session of the state legislature belgaum
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements