बेळगाव—belgavkar—belgaum : कसनाळ (ता. निपाणी) येथील ३५ हून अधिक रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. गावात कूपनलिकेद्वारे पाण्याचा पुरवठा होतो. या कूपनलिकेला एका ठिकाणी लिकेज होऊन गटारीतील सांडपाणी कूपनलिकेच्या पाण्यात मिसळल्याने ही समस्या निर्माण झाली आहे असे माणकापूर ग्राम पंचायतीचे अध्यक्ष सुनील म्हाकाळे यांनी सांगितले.
दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने गावात गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. परिणामी गॅस्ट्रोची तीव्रता लक्षात घेऊन काही रुग्णांना नजीकच्या माणकापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, कारदगा प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, सांगली सिव्हिल हॉस्पिटल, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी आदी ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रविवारपासून उलटी, जुलाबचा काही ग्रामस्थांना त्रास होऊ लागला. नंतर ही समस्या गावात बऱ्याच ठिकाणी उद्भवल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. खबरदारी म्हणून उपचारासाठी वरील ठिकाणी सोयीनुसार रुग्णांना दाखल करण्यात आले. यातील चौदाहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. सदर घटना रविवारी माणकापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला समजली. येथील डॉ. दिलीप पवार, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या यांनी सोमवारी सकाळी घरोघरी पाहणी, जागृती करून प्राथमिक उपचार केले.
मंगळवारी रात्री तालुका आरोग्य अधिकारी सुकुमार बागाई यांनी भेट देऊन गावातील परिस्थितीची पाहणी केली. तसेच रात्रीतून काही समस्या उद्भवल्यास ग्रामस्थांच्या सोयीसाठी चिकोडी येथील अँम्बुलन्सची व्यवस्था कसनाळ येथे करण्यात आली आहे. कसनाळ गावात २४ तास अँम्बुलन्सची सोय केली असून उपचारासाठी कंपाऊंडरची, नर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
kasnal nipani water belgaum issue
kasnal nipani water belgaum issue
kasnal nipani water belgaum issue
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements