Protection Of Children from Sexual Offences Act (POCSO Act)
बेळगाव—belgavkar—belgaum : अल्पवयीन युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो न्यायालयाने युवकाला 20 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि ₹ 10000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हुलीगेप्पा शिवलिंगप्पा वड्डर (रा. उगरगोळ ता. सौंदत्ती) असे युवकाचे नाव आहे.
१३ ऑक्टोबर २०२१ रोजी त्याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला मंगळूरला नेले. त्या ठिकाणी आपल्या मैत्रिणीच्या खोलीवर ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पीडितेने सौंदत्ती पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून घेऊन हुलिगेप्पाला अटक केली.
पोक्सो न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. आरोप सिध्द झाल्याने न्यायालयाने आरोपीला वीस वर्षाची कठोर शिक्षा आणि दहा हजार रुपयांच्या दंड ठोठावला. तसेच जिल्हा कायदा प्राधिकरणाकडून एक लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्याचा आदेश देखील बजावण्यात आला. सरकारी वकील म्हणून अँड. एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.
pocso saundatti court 20 year belgaum
pocso saundatti court 20 year belgaum
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements