ट्वेंटी-20 वर्ल्ड कपसाठी बॅकअप खेळाडू तयार
T20 World Cup : आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन बीसीसीआय व संघ व्यवस्थापन कामाला लागले आहेत. रोहित शर्मा व विराट कोहली यांचे 14 महिन्यानंतर ट्वेंटी-20 संघात पुनरागमन हे त्या दृष्टीने टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. 2022च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपनंतर रोहित व विराट शॉर्ट फॉरमॅटपासून दूर आहेत आणि हार्दिक पांड्याच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली. त्यामुळे जून 2024 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये हार्दिकच ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व करेल अशी चर्चा होती, परंतु रोहितच्या एन्ट्रीने ती मावळली आहे. त्याचवेळी हार्दिकचा फिटनेस हा नेहमीच चर्चेत राहणारा विषय आहे. हिच गोष्ट लक्षात घेऊन BCCI ने बॅकअप प्लान तयार केला आहे.
वन डे वर्ल्ड कप 2023 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या लढतीत हार्दिकचा पाय मुरगळला आणि त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-20 मालिका, दक्षिण आफ्रिका दौरा आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेला मुकला आहे. इंडियन प्रीमिअर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिककडे सोपवण्यात आले खरे, परंतु तो काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. हार्दिकच्या या अनिश्चिततेमुळे बीसीसीआयने बॅकअप म्हणून शिवम दुबेकडे लक्ष वळवले आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत शिवमने मॅच विनिंग खेळी केली आहे. त्याने पहिल्या सामन्यात नाबाद 60 आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 63 धावांची खेळी केली. गोलंदाजीतही त्याने विकेट्स घेतल्या आहे. हार्दिकच्या तंदुरुस्तीबाबत साशंकता असल्याने बीसीसीआयने शिवमला ट्वेंटी-20 वर्ल्ड कपसाठी तयारी करण्याचे संकेत दिले आहेत. कर्णधार रोहित शर्माही त्याला डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीला आणून त्याच्याकडून तयारी करू घेतोय. ”शिवमने अधिकाधिक गोलंदाजी करण्याची गरज आहे. त्याने उत्तम गोलंदाजी केल्यास तो संघासाठी मौल्यवान खेळाडू ठरू शकतो. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे शिवमवरील जबाबदारी वाढू शकते,”असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
शिवमने 3 वर्षांनंतर भारताच्या ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले. आयर्लंडविरुद्धच्या 2023च्या मालिकेत त्याची निवड झाली होती. इंडियन प्रीमिअर लीग 2023 मधील दमदार कामगिरीमुळे त्याचे पुनरागमन झाले. त्याने आतापर्यंत 20 आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त 45.83च्या सरासरीने 275 धावा केल्या आहेत आणि 8 विकेट्सही घेतल्या आहेत.
India’s search for Hardik Pandya’s replacement: Shivam Dube emerges as a potential option
T20 World Cup: Hardik Pandya’s place in Danger? Shivam Dube aiming to secure spot in T20 WC squad
Hardik Pandya replacement T20 World Cup
Hardik Pandya replacement T20 World Cup
Hardik Pandya replacement T20 World Cup
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements