आता माजी उपमुख्यमंत्रीही भाजपत जाणार?
बेळगाव Karnataka Politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी जय श्रीराम म्हणत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी काँग्रेसमध्ये आलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदीही नाराज असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने त्यांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता, तो पाळला नाही, अशी सवदी यांची भावना असून ते काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा आहे. तेही भाजपमध्ये परतणार अशी चर्चा सुरू आहे (Congress wary of Laxman Savadi exit).
शेट्टर यांच्यापाठोपाठ बेळगाव जिल्ह्यातील बडे नेते सवदी यांनीही पक्ष सोडला तर लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसने दोघांनाही तिकिट दिले होते. विधानसभेला सवदी जिंकले; मात्र शेट्टर यांचा मोठ्या मताधिक्क्यांनी पराभव झाला. त्यानंतरही काँग्रेसने शेट्टर यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आज प्रत्यक्षात उतरली. माजी उपमुख्यमंत्री शेट्टर यांनी आज भाजपत पुन्हा प्रवेश केला.
कॉंग्रेसमध्ये बेळगावच्या अथणीतून सवदी आमदार असले तरी समाधानी नाहीत. कॉंग्रेस सरकारमध्ये माजी उपमुख्यमंत्री असलेल्या सवदींना स्थान मिळाले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. पण, शेट्टर यांच्या प्रमाणे ते काँग्रेस सोडणार का, याबाबत उत्सुकता आहे. भाजपमध्ये परतण्याचा निर्णय सवदींनी घेतला तर लोकसभा निवडणुकीआधी कॉंग्रेसला मोठा फटका बसू शकतो.
शेट्टर आणि सवदी हे दोन्ही नेते लिंगायत समाजातील असून त्यांच्यामुळे लिंगायत समाजाच्या मतांची विभागणी विधानसभा निवडणुकीत झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. भाजपने शेट्टर व सवदी या दोघांनाही उमेदवारी नाकारली होती, त्याचा तोटा भाजपला झाला होता. हे दोन्ही नेते पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले होते. या दोघांची नाराजी काँग्रेसच्या फायद्याची ठरली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दोघांनाही काँग्रेस उमेदवारी दिली. मात्र, शेट्टर यांचा पराभव झाला. मात्र शेट्टर यांना तातडीने विधान परिषदेवर नेमले. मात्र, सवदी यांना मंत्रिपदाची अपेक्षा हेाती. मात्र, त्यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे सवदी व त्यांचे समर्थक नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
Karnataka : Congress wary of Laxman Savadi exit, another ‘Operation Lotus’
Congress wary of Laxman Savadi exit
Congress wary of Laxman Savadi exit
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements