का आहे ‘Happy Hypoxia’ धोकादायक आजार?
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सध्या आरोग्य समस्या सतावत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना आणि स्वाईन फ्लू झाल्याचे समोर आले होते. आता गेहलोत यांना ‘हॅप्पी हायपॉक्सिया’ झाला आहे. गेहलोत यांनीच याची माहिती दिली आहे. शरीरात ऑक्सिजन कमी झाल्याने निर्माण झालेली ही आरोग्य समस्या आहे. ‘Happy Hypoxia’ हा धोकादायक आजार आहे, पण डॉक्टरांनी वेळेतच याचे निदान केले असल्याचे गेहलोत यांनी सांगितले.
गेहलोत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात पोस्ट करुन माहिती दिली आहे. लोकांनी सतर्क राहावे असं देखील ते म्हणाले आहेत. अनेक संशोधनातून समोर आलंय की कोरोनाची लागण झाल्यावर आणि त्यातून बरे झाल्यानंतर देखील शरिरातील ऑक्सिजन पातळी कमी होत आहे, याला हॅपी हायपॉक्सिया म्हटलं जातं. या आजाराची कधीकधी रुग्णाला देखील माहिती होत नाही. कारण, श्वास घेण्यास कसलाच त्रास होत नाही. पण, याकडे दुर्लक्ष झालं तर हा आजार गंभीर स्वरुप धारण करु शकतो (happy hypoxia (very low oxygen saturation levels)).
कोरोनाची लागण झाल्यानंतर मला हॅप्पी हायपॉक्सिया झाला आहे. डॉक्टरांनी याचे लवकरच निदान केलं आहे. पण, या आजारामुळे मला पाच ते सहा दिवस खूप त्रास झाला. आरोग्या संबंधात अडचण निर्माण झाल्यास ऑक्सिजनची पातळी तपासली जाते. सध्या अनेक पसरणारे आजार बळावत आहेत. अशात रुग्णाची वेळोवळी ऑक्सिजन पातळी तपासली जावी, असं ते म्हणाले आहेत.
हॅप्पी हायपॉक्सिया का आहे धोकादायक?
Hypoxemia is defined as “a decrease in the partial pressure of oxygen in the blood.” कोरोना विषाणूचे आगमन झाल्यानंतर अनेक लोकांना त्याची लागण झाली. अनेकांचा यात मृत्यू झाला तर अनेकांना इतर आरोग्य समस्या जाणवू लागल्या. हॅप्पी हायपॉक्सिया हा ही त्यातलाच एक आजार आहे. यात रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. ऑक्सिजनची पातळी अधिक कमी झाल्यास शरिरातील महत्त्वाचा भाग काम करणे बंद होते. अनेक रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी तर कमी होते, पण श्वास घेण्यास त्रास जाणवत नाही. त्यामुळे वेळेत उपचार झाला नाही तर तो धोकादायक ठरु शकतो.
rajasthan former cm ashok gehlot Happy Hypoxia
rajasthan former cm ashok gehlot Happy Hypoxia
rajasthan former cm ashok gehlot Happy Hypoxia
rajasthan former cm ashok gehlot Happy Hypoxia
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements