हृदयविकाराचा झटका हा सायलेंट किलर ठरत आहे. गेल्या काही काळापासून तरुणांमध्ये ज्याप्रकारे हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे हे चिंता वाढवणारे आहे. आता केवळ तरुणच नाही तर लहान निरागस मुलेही त्याला बळी पडत आहेत. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 5 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मुलगी मोबाईलवर कार्टून पाहत होती. अचानक तिच्या हातून मोबाईल खाली पडला आणि ती बेशुद्ध झाली. कुटुंबीयांनी मुलीला तात्काळ रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावातील हे प्रकरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेश खरगवंशी यांची 5 वर्षांची मुलगी कामिनी शुक्रवारी (19 जानेवारी) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आईसोबत मोबाईलवर कार्टून पाहत बसली होती. अचानक कामिनीच्या हातातून मोबाईल निसटला आणि ती जमिनीवर पडली.
आधी आईला वाटले की तिने मोबाईल मुद्दाम टाकला. पण काही वेळाने तिने कामिनीला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. कुटुंबीयांनी मुलीला घेऊन तातडीने डॉक्टरांकडे धाव घेतली, मात्र तिचा जीव वाचू शकला नाही. कामिनी ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. 30 जानेवारीला तिचा पाचवा वाढदिवस होता.
अलिकडच्या काळात भारतात हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. यापूर्वी, बहुतेक मध्यमवयीन लोक या आजाराचे बळी होते. तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले. गेल्या काही महिन्यांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जेव्हा तरुणांनाही हृदयविकाराचा झटका आला. मात्र आता हृदयविकाराच्या झटक्याने एका 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
5-yr-old girl dies of heart attack in UP
5-yr-old girl dies of heart attack in UP
5-yr-old girl dies of heart attack in UP
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements