‘यशस्वी’ भव…! जैस्वालचे दणदणीत द्विशतक
Yashasvi Jaiswal hits maiden double ton
India vs England Live Score 2nd Test Day 2 : भारत इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने जबरदस्त कामगिरी केली. इंग्लंडच्या बेझबॉल रणनितीला जोरदार प्रत्युत्तर दिलं. कसोटीत आक्रमक खेळी करत द्विशतकी खेळी केली. भारताने पहिल्या डावात केलेल्या धावांमध्ये निम्म्या धावा या एकमेव यशस्वी जयस्वालच्या आहे. एकीकडे धडाधड विकेट्स पडत असताना यशस्वी जयस्वालने एकहाती टीम इंडियाचा डाव सावरला. भारताला पहिल्या डावात मजबूत आघाडी मिळवून दिली. इंग्लंडचं प्रत्येक मारा त्याच वेगाने परतवून लावला. भारतीय क्रिकेट इतिहासात द्विशतकी खेळी करणारा तिसरा तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी विनोद कांबळीने दोन वेळा, तर सुनील गावस्कर यांनी एकदा अशी कामगिरी केली आहे (Jaiswal’s 209 powers IND to 396 at ACA-VDCA Cricket Stadium in Visakhapatnam).
कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही त्याचा समावेश झाला आहे. वीरेंद्र सेहवाग, वसीम जाफर, शिखर धवन यांच्यानतर चौथा फलंदाज ठरला आहे. यशस्वी जयस्वालच्या द्विशतकी खेळीने भारताने 396 धावा केल्या आहेत. आता भारतीय गोलंदाजांचा कस लागणार आहे. गोलंदाज पहिल्या डावात कशी कामगिरी करतील याकडे लक्ष लागून आहे. फिरकीपटू आर अश्विन आणि कुलदीप यादव यांच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे.
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर या कसोटीतही भारताचे इतर फलंदाज फारसे ठसा उमटवू शकले नाहीत. पण यशस्वी जैस्वालने एक बाजू लावून धरली आणि 290 चेंडूचा सामना करत 209 धावांची खेळी केली. यासोबतच त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या पराक्रमाशी बरोबरी केली. 2007 साली गांगुलीने पाकिस्तानविरूद्ध द्विशतक ठोकले होते. त्यानंतर पहिल्यांदाच एका डावखुऱ्या भारतीय सलामीवीराने कसोटी द्विशतक ठोकले (Yashasvi Jaiswal hits maiden double ton).
रोहित शर्मा (14) व शुबमन गिल (34) हे बाद झाल्यानंतर जैस्वालने तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह (27) 131 चेंडूंत 90 धावांची भागीदारी केली. त्यानंतर यशस्वी व पदार्पणवीर रजत पाटीदार यांनी 124 चेंडूंत 70 धावांची भागीदारी केली. रजतने 72 चेंडूंत 32 धावांची संयमी खेळी केली. अक्षर पटेलसह (27) त्याने पाचव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. यशस्वीने साथीदारांना सोबतीला घेऊन चौघांसोबत 40 धावांहून अधिक धावांची भागीदारी करून इंग्लंडला बॅकफूटवर फेकले. पहिल्या दिवशी 179 धावांवर नाबाद राहून यशस्वीने अनेक विक्रम मोडले आणि भारताला 6 बाद 336 धावांपर्यंत पोहोचवले होते. दुसऱ्या दिवसाची सुरुवातही त्याने आक्रमकच केली. रविचंद्रन अश्विनची त्याला साथ मिळाली. पण अश्विन बाद झाल्यावर त्याने धावांची गती अधिक तीव्र केली. यशस्वीने सुरुवातीला षटकार आणि चौकार मारून आपले द्विशतक साजरे केले. त्यानंतर धावा काढण्याच्या प्रयत्नातच तो 209 धावांवर झेलबाद झाला.
दुसऱ्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग 11: जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
Yashasvi Jaiswal hits maiden double ton
Yashasvi Jaiswal hits maiden double ton
Yashasvi Jaiswal hits maiden double ton
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements