हा झेल पाहिला तर असंच म्हणाल, पाहा कसा पकडला Super Smash
Super Smash T20 match between Wellington and Central Districts in New Zealand : जगभरात टी20 क्रिकेटचं वेड पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी टी20 स्पर्धांचं आयोजन केलं जात आहे. न्यूझीलंडमध्येही बर्गर किंग सुपर स्मॅश टी20 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत वेलिंग्टन फायरबर्ड्स आणि सेंट्रल स्टॅग्स हे दोन संघ आमनेसामने आले होते. यावळी वेलिंगस्टन फायरबर्ड्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी केली. वेलिंगटोन फायरबर्ड्स संघाने 8 गडी गमवून 147 धावा केल्या आणि विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं. सेंट्रल स्टॅगने 4 गडी गमवून 148 धावा केल्या. हा सामना 6 गडी राखून सेंट्रल स्टॅगने जिंकला (Super Smash 2023-24).
विजयी धावांचा पाठलाग करताना यंग आणि बोयले ही जोडी मैदानात उतरली होती. दोघांनी 5 षटकात 36 धावा केल्या होत्या. त्यामुळे ही जोडी फोडण्याचं मोठ आव्हान होतं. त्यामुळे सहावं षटक स्नेडनकडे सोपण्यात आलं. स्नेडनच्या दुसऱ्या चेंडूवर यंगने उत्तुंग फटका मारला. पण जॉनसनने पाठमागे जोरदार धावा घेतली आणि सीमारेषेवर उलटा कॅच पकडला. तसेच षटकार जाऊ नये म्हणून चेंडू मागे फेकला. केलीने लगेच तो झेल घेतला आणि यंगला तंबूचा रस्ता दाखवला. हा क्रिकेटमधील सर्वात कठीण आणि जबरदस्त झेल असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे (Troy Johnson and Nick Kelly’s stunning combined effort went viral – an amazing catch).
विल यंगची विकेट पडल्यानंतर जॅक बोयलने बाजू सावरली. त्याने 43 चेंडूत 57 धावा केल्या. यात 10 चौकारांचा समावेश होता. वेलिंग्टोन फायरबर्ड्सने दिलेलं आव्हान संघाने 4 गडी गमवून आणि 19 चेंडू राखून पूर्ण केलं. असं असलं तरी वेलिंगटोनचा संघ 22 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर सेंट्रल स्टॅग संघ गुणतालिकेत 16 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
WATCH : Troy Johnson, Nick Kelly take stunning catch in Super Smash
WATCH catch in T20 Super Smash
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements