अंगावरील कपडे काढून महिलेला मारहाण
बेळगाव-belgavkar :काही महिन्यांपूर्वीच वंटमुरी गावात एका महिलेला अर्धनग्न अवस्थेत बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता अशीच एका भयावह घटना बेळगाव शहरातील वड्डरवाडी येथे घडली.
वड्डरवाडी येथे वेश्याव्यवसायाच्या (Prostitution) आरोपावरून महिला व तिच्या मुलीला शेजाऱ्यांनी मारहाण करून त्यांचे कपडे फाडले. येथे आई आणि मुलगी एकाच घरात राहतात. शेजारील कुटुंब महिलेवर वेश्याव्यवसायाचा आरोप करत होते.
घरी वारंवार अनोळखी व्यक्ती येत असतात. याचा राग धरून सदर महिलेच्या घरावर शेजाऱ्यांनी हल्ला करून आई आणि मुलीला ओढून बाहेर आणले आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडून मारहाण केली. याप्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेजाऱ्याने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत असून या कृत्याचा व्हिडिओ मोबाईल फोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
belgaum woman attack in public
belgaum woman attack in public
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements