Swarm of mosquitoes form ‘tornado’ over Pune
जगभरात विविध ठिकाणी लोकांना वादळाचा, चक्रीवादळाचा सामना करावा लागतो. मात्र पुण्यात नुकताच एक वेगळा पण अतिशय हैराण करणारा प्रकार पहायला मिळाला. शहरात डासांचा हल्ला…. हो, हे आमचं नव्हे तर पुणेकराचं म्हणणं आहे. पुण्यातील मुळा मुठा नदीत वाढलेल्या जलपर्णीमुळे केशवनगर खराडी भागात मच्छरांचं जाळं एवढं वाढलं की काल हवेत वादळ आल्यासारखे मच्छर घोंगावत होते. डासांचं हे वादळ पाहून पुणेकर अक्षरश: हैराण झाले. जो-तो मान वर करून हवेतलं हे वादळ फक्त पहातच होता. याचा थक्क करणारा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. डासांचं हे चक्रीवादळ केशवनगर खराडी भागात पहायला मिळालं (Swarm of mosquitoes form tornado over Pune; video goes viral).
या व्हिडीओमध्ये मच्छर/डासांची एक संपूर्ण झुंडच्या झुंडच एकत्र येऊन उडताना दिसतं होतं. हे काही भागात कॉमन असून शकतं पण शहरी भागांत असं चित्र फारच कमी दिसतं. हा व्हिडीओ व्हायरल होताच, लगेच कारवाई करून सफाई करण्यात आली. मात्र डासांच्या या वादळामुळे पुणेकर प्रचंड हैराण झाले होते. अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. एवढंच नव्हे तर लहान मुलंही डासांमुळे त्रस्त झाली होती. नदीपात्रातील पाण्यामुळे डासांची ही झुंड आली असा अंदाज व्यक्त होत आहे.
Mosquitoes tornado in #kharadi.
Hope this will be taken care of soon.@aaplasurendra @Kharadicivic @aolkharadi pic.twitter.com/vNcEv3FU0F
— Flt Lt Virender Singh Virdi (Retd.) (@vsvirdi) February 9, 2024
अशाच काही घटना यापूर्वीही निकारागुआ आणि जगातील इतर काही शहरात घडल्या होत्या. गेल्या वर्षी निकारागुआ येथील एका प्रसिद्ध तलावाजवळ, लोकांना असंच एक चक्रीवादळ पहायला मिळालं होतं. ते पाहून काय घडतंय, हे काही वेळ लोकांना समजलंच नाही. पण ते डास त्यांच्या घराजवळ पोहोचताच, त्यांच्या घराजवळ धुकं दाटून आल्यासारखं झालं. बराच वेळ ते वादळ सुरू होतं, अशी माहिती समोर आली.
Viral Video Mosquito Tornado Near Kharadi Pune
Viral Video Mosquito Tornado Near Kharadi Pune
Viral Video Mosquito Tornado Near Kharadi Pune
Viral Video Mosquito Tornado Near Kharadi Pune
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements