लग्झरी प्रीमियम व्हिस्की. काय आहे ही व्हिस्की? तिची किंमत किती?
Spirit of Victory 1999 Pure Malt Whisky
तळीरामांसाठी एक भन्नाट बातमी आहे. रामपूर व्हिस्की आणि 8 पीएम सारख्या प्रीमियम व्हिस्की बनवणाऱ्या कंपनीने आता आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवीन प्रीमियम व्हिस्की लॉन्च केली आहे. जैसलमेर इंडियन क्राफ्ट जिन सारख्या लग्झरी दारुच्या ब्रँडच्या यशानंतर इंडियन स्पिरिट मेकर रेडिओ खेतानने स्पिरिट व्हिक्ट्री 1999 प्युअर माल्ट व्हिस्की लॉन्च केली आहे. 1999 मधील कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून ही व्हिस्की तयार करण्यात आली आहे (Radico Khaitan launches ‘Spirit of Victory 1999 Pure Malt Whisky’ for ₹ Rs 5000).
1965 द स्पिरीट ऑफ व्हिक्ट्री प्रीमियम XXX रम आणि 1965 स्पिरिट ऑफ व्हिक्ट्री लॅमन डॅशच्या यशाची परंपरेला कायम ठेवण्याचं काम नवी व्हिस्की करत आहे. या कॅटेगिरीतील प्रत्येक प्रोडक्ट गुणवत्ता लक्षात घेऊनच तयार करण्यात आलं आहे. या लॉन्चिंगनंतर कंपनी प्युअर माल्ट व्हिस्कीचा लाभही उठवत आहे.
किंमत किती? : उत्तर प्रदेश आणि हरियाणात सुरुवातीला या व्हिस्कीचं वितरण होणार आहे. त्यानंतर इतर राज्यांमध्येही या व्हिस्कीचं वितरण केलं जाणार आहे. रेडिको खेतानने ही व्हिस्की अत्यंत स्वस्तात दिली आहे. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धातील शहिदांना समर्पित करण्यात आलेल्या या स्पिरिट ऑफ व्हिक्ट्रीची सुरुवातीची किंमत ₹ 5000 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.
रामपूर व्हिस्की जगातील 30 देशात वितरीत केली जाणार आहे. तर जैसलमेर जिन जवळपास 25 देशात वितरीत केली जाणार आहे. व्हिस्की आणि जिनला प्रीमीयम स्पिरिट कॅटेगिरीतून चांगलं ट्रॅक्शन मिळालं आहे. प्रीमियम व्हिस्की रामपूरची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने आपल्या प्लांटच्या ढाच्याचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूक केली आहे, असं स्पिरिटच्या निर्मात्याने सांगितलं. कंपनीने तेव्हापासून आपली malt distillation आणि maturation क्षमतेचा विस्तार केला आहे. दरम्यान, कंपनीने त्यासाठी किती गुंतवणूक केलीय याचा खुलासा केलेला नाही.
किती वाढ झाली? : दारू बनविणारी कंपनी रेडिको खेतान लिमिटेडने मंगळवारी डिसेंबर 2023ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीसाठी कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिटमध्ये 22.75 टक्के वाढीसह 75.15 कोटी रुपयांची वाढ नोंदवली आहे. कंपनीने एक वर्षापूर्वी ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 61.22 कोटी रुपये कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट मिळवलंय. रेडिको खेतानने बीएसई फायलिंगमध्ये म्हटलंय की, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील परिचालनने त्यांचा महसूल 34.1 टक्के वाढून 4,245.95 कोटी झाला आहे. एक वर्षापूर्वी याच काळात हा नफा 3,166.19 कोटी एवडा होता. डिसेंबर तिमाहीत रेडिको खेतानचा एकूण खर्च 34.28 टक्के वाढून 4,152.65 कोटी रुपये झाला.
कंपनी आफ्टर डार्क व्हिस्की (After Dark Whisky), कोन्टेसा रम (Contessa Rum), मॅजिक मोमेंट्स वोडका (Magic Moments Vodka) आदी ब्रँड विकत आहे. कंपनीने या वर्षी ऑक्टोबरमध्ये रॉयल रणथंभोर हेरिटेज कलेक्शन- रॉयल क्राफ्टेड व्हिस्की (Royal Ranthambore Heritage Collection-Royal Crafted Whisky) लॉन्च केली आहे.
Spirit of Victory 1999 Pure Malt Whisky
Spirit of Victory 1999 Pure Malt Whisky
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements