संगीत क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार
पुणे : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अखेर आज (शनिवार) हृदय विकाराच्या झटक्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रभा अत्रे हे शास्त्रीय संगीत जगतातील अत्यंत प्रसिद्ध नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता अत्रे यांच्या गायनाने होत होती. यंदाही त्या गाणार होत्या. मात्र आजारपणामुळे त्या कार्यक्रमाला जाऊ शकल्या नव्हत्या. शास्त्रीय संगीताचा वारसा जपलेल्या महान गायिका म्हणून त्या ओळखल्या जातात. अत्रे यांनी अनेक शिष्ये घडवली आहेत.
अत्रे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1932 रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील दत्तात्रय पिलाजी हे पुण्यातील एका शाळेत मुख्याध्यापक होते. तर आई इंदिरा या शिक्षिका होत्या. पालक शिकवत असलेल्या शाळेतच त्यांनी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांचं संगीत क्षेत्रातील पदार्पण हा योगायोग होता. प्रभा अत्रे या आठ वर्षांच्या असताना त्यांची आई आजारी पडली. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाजवळच्या एका मित्राने त्यांना संगीतात चांगलं काम करू शकता, असं सुचवलं होतं. या गायनातूनच त्यांना छंद म्हणून शास्त्रीय संगीत शिकण्याची प्रेरणा मिळाली.
प्रभा अत्रे यांनी सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडे संगीताचं प्रशिक्षण घेतलं. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खान यांची ती मुलं होती. संगीताचं प्रशिक्षण घेत असतानाच अत्रे यांना पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदवी मिळवली. त्यानंतर लॉ कॉलेजमधून त्यांनी स्नातक पदवी संपादित केली. संगीत अलंकार आणि संगीत प्रवीण या पदव्याही त्यांनी मिळवल्या. अत्रे या ‘सूर संगम’सारख्या संकल्पनांवर आधारित मैफलींसाठी प्रसिद्ध आहेत.
अत्रे यांनी चिंतुबुवा दिवेकर, गणपतराव बोडस, प्रसाद सावकार, मास्टर दामले, भालचंद्र पेंढारकर, राम मराठे, प्रभाकर पणशीकर यांच्यासह नाट्यक्षेत्रात काम केलं होतं. 1957 मध्ये त्यांच्या पहिल्या ‘शारदा’ या संगीत नाटकाच्या वेळी देशाचे तत्कातीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा गौरव केला होता. अत्रे यांनी संगीतातील विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण पुस्तकंदेखील लिहिली आहेत.
Renowned classical singer Prabha Atre
Vocalist Prabha Atre passes away aged 90
Renowned classical singer Prabha Atre
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements