Munjya Movie
नुकताच ‘मुंज्या’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय (Munjya Movie). या सिनेमात महाराष्ट्रात प्रचलित असलेलं ‘मुंज्या’ हे भूत एका सामान्य मुलाला कसं त्रास देतं ते दाखवण्यात आलं आहे. पण हे मुंज्या नावाचं भूत खरंच अस्तित्वात असतं का? काय आहे त्यामागची दंतकथा जाणून घ्या.
मुंज्या हा महाराष्ट्रीय संस्कृतीतील एक प्रकारचं भूत आहे ज्याचा मृत्यू त्यांच्या मुंजीनंतर म्हणजेच उपनयन सोहळ्यानंतर लग्न न होताच होतो. चित्रपटातही एका अशाच मुंज्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
प्रत्येक व्यक्ती ब्रह्मचर्य (विद्यार्थी), गृहस्थ, वानप्रस्थ (त्याग करण्यापूर्वीचे जीवन), आणि संन्यास या 4 टप्प्यात जीवन जगतो. त्यात ब्रह्मचर्य स्वीकारण्याआधी त्याच्यावर उपनयन संस्कार म्हणजेच मराठीत त्याची मुंज केली जाते.
हा समारंभ मुलाला त्याच्या विद्यार्थी अवस्थेत आणतो. तर सोड मुंज ही त्याच्या लग्नाआधी म्हणेजच गृहस्थाश्रम स्वीकारण्याआधी केली जाते. हा सोहळा सहसा लग्नाच्या विधींचा एक भाग आहे. पण मुंज होऊनही जर एखादी व्यक्ती लग्न न होताच मरण पावली तर त्याला मुंज्या म्हणतात.
मुंज्याचा आत्मा सहसा पिंपळाच्या झाडांजवळ किंवा विहिरीजवळ राहतो असं म्हणतात. तसंच हे भूत सामान्य लोकांना मारत नाही किंवा दुखापत करत नाही असंही बोललं जातं.
‘बारा पिंपळा वरचा मुंज्या’ हा असाच एक मराठी वाक्प्रचार आहे. मुंज्याचा आत्मा इतका चंचल असतो की तो एका पिंपळाच्या झाडावरुन दुसऱ्या पिंपळाच्या झाडावर फेऱ्या मारत असतो. पण मुंज्याची भीती सामान्य लोकांच्या मनात निर्माण करण्यामागे एक शास्त्रपण असून शकतं. कारण पिंपळाची झाडे अंधार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड सोडतात. त्यामुळं सूर्यास्तानंतर कोणीही पिंपळाच्या झाडाखाली बसू नये म्हणून मुंज्याची भीती लोकांच्या मनात निर्माण केली असावी असं मानणारा देखील एक वर्ग आहे.
Munjya Movie
Munjya Movie
Munjya Movie
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements