कर्नाटकमधील एका छोट्याशा गावात एक सुपरस्टार चक्क आपल्या बायकोसाठी कुल्फी खरेदी करताना दिसला. फिल्मी ग्लॅमरपासून दूर जात अगदी साधेपणा जपत छोट्याश्या किराणाच्या दुकानात पोहचलेल्या या सुपरस्टारला तुम्ही ओळखलं का? हा सुपरस्टार दुसरा-तिसरा कोणी नसून ज्यांची संपुर्ण भारतात क्रेझ पाहायला मिळते, तो रॉकी भाई अर्थात दाक्षिणात्य सुपरस्टार यश आहे.
KGF या गाजलेल्या सिनेमामुळे तो रातोरात लोकप्रिय झाला. त्यामुळे त्याला ओळखत नाही असं म्हणणारा क्वचितच एखादा व्यक्ती सापडेल. छोट्या पडद्यापासून अभिनयाची कारकिर्द सुरु करणाऱ्या यशने आज साऊथ इंडस्ट्रीत त्याचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. एवढा मोठा सुपरस्टार असूनही त्याची मातीशी नाळ जोडलेली आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये यश एका किराणा दुकानात आपल्या बायकोसोबत पाहायला मिळाला आहे. त्याच्या साधेपणाने चाहत्यांची मनं जिंकली आहे.
यश नुकताच चित्रापुर मठ येथे गेला होता. तेव्हा पत्नी राधिकाही त्याच्याबरोबर होती. फोटोमध्ये यश किराणाच्या दुकानात दिसत असून त्याची पत्नी स्टूलवर बसलेली पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेता एका डब्यातून चॉकलेट घेताना दिसत आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला केला. ऐवढचं नव्हे तर मुलगा सुपरस्टार असूनही यशचे वडीलदेखील कर्नाटक राज्य परिवहन सेवेत बस ड्रायव्हर म्हणून काम करत होते. यशचा ‘केजीएफ’ चित्रपट प्रदर्शित होऊन, तुफान चालला, तरीही त्याच्या वडिलांनी आपली नोकरी सोडली नव्हती.
विश्व जरी ‘रॉकी भाई’ला यश म्हणून ओळखत असलं तरी, त्याचं खरं नाव वेगळंच आहे. यशचं पूर्ण नाव नवीन कुमार गौडा आहे. तर यशच्या पत्नीचं नाव राधिका असं आहे. साऊथमधील लोकप्रिय कपलमध्ये यश आणि राधिका यांच आवर्जुन नाव घेतलं जातं. 2016 मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधून त्यांच्या संसाराची सुरुवात केली. यशने आपल्या वडिलांचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो, असे अनेकदा म्हटले आहे. वडिलांची नोकरी ही त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. यामुळे आमची नाळ मातीशी जोडलेले राहते, असे यश म्हणतो.
अनेक तरुणींचा क्रश असलेल्या यशला त्याच्या पत्नीने राधिकाने सुरुवातीला चक्क रिजेक्ट केलं होतं. इतकंच नाही तर तिचा होकार मिळावा यासाठी यशने 6 महिने वाट पाहिली होती. राधिका आणि यश यांच्या लग्नाला 7 वर्ष झाली आहेत. त्यांना आर्य आणि यथर्व ही दोन मुलं सुद्धा आहेत.
Yash purchases candy from roadside shop
Yash purchases candy from roadside shop
Yash purchases candy from roadside shop
Yash purchases candy from roadside shop
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements