Kannada actor ‘Challenging Star’ Darshan arrested in murder case
- Kannada actor Darshan arrested in murder case
- अभिनेत्री पवित्रा यांना अश्लील संदेश
- रेणुका स्वामी यांची हत्या
- याआधी अफेअर असल्याच्या अफवा
कर्नाटक—belgavkar : कन्नड अभिनेता ‘चॅलेंजिंग स्टार’ दर्शन याला अटक करण्यात आली आहे. म्हैसूरमधील पोलिसांनी दर्शनला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार दर्शनला एका हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. चित्रदुर्गातील रेणुका स्वामी यांच्या हत्येप्रकरणी अभिनेता दर्शन हा आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. कन्नड अभिनेता दर्शन याला एका हत्येप्रकरणी कामाक्षी पाल्य पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, रेणुका स्वामी नावाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे ज्याने (रेणुका स्वामी) अभिनेत्री पवित्रा गौडा यांना अश्लील संदेश पाठवले होते. शनिवारी रात्री आरआर नगरमधील अभिनेत्रीच्या निवासस्थानाच्या शेडमध्ये त्याची (रेणुका स्वामी) हत्या करण्यात आली. वृत्तानुसार, कामाक्षी पाल्या येथील नाल्यातून मृतदेह काढण्यात आला.
याआधी अभिनेता दर्शनचे अभिनेत्री पवित्रा गौडासोबत अफेअर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. कन्नड अभिनेता दर्शनची पत्नी विजया लक्ष्मी हिने पवित्रा गौडावर तिच्या वादग्रस्त इन्स्टाग्राम पोस्टवरून जोरदार टीका केली होती. रेणुकास्वामी यांनी पवित्रा गौडा यांना एक असभ्य संदेश शेअर केला होता. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे बोलले जात आहे. रेणुकास्वामी यांचा मृतदेह कल्व्हर्टमध्ये आढळून आला. दर्शनचा नंबर आरोपींच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असल्याचे दिसते, व्हॉट्सॲप कॉल आणि काही साक्षीदार सापडले आहेत. अधिक तपास करून माहिती बाहेर यायची आहे.
Kannada actor Darshan arrested
Kannada actor Darshan arrested
Kannada actor Darshan arrested
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements