- पर्यटकांच्या काळजाचा ठोका चूकवणाऱ्या घटनांत वाढ
- पहाटेची वेळ होती आणि अचानक अंबोली घाटात…
- महाराष्ट्राची चेरापुंजी असलेल्या सिंधुदुर्गातील आंबोली घाटात भला मोठा दगड रस्त्यावर कोसळला…
सिंधुदुर्ग @गुरुवार : सिंधुदुर्गात पावसाळा सुरू होण्यापूर्वीच घाट मार्गावर दरडी हळूहळू कोसळायला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्गातील आंबोली घाट, करूळ घाट, भुईबावडा फोंडा, फोंडा घाट मार्ग हे पश्चिम महाराष्ट्राला जोडले जाणारे घाट असून या मार्गांवर दिवस रात्री वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. त्यामुळे या मार्गांवर वारंवार दरड कोसळण्याच्या घटनांवर प्रशासनाने ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.
सिंधुदुर्गातील आंबोली येथील घाटात धबधब्याच्या परिसरात गुरुवारी पहाटे भला मोठा दगड रस्त्यावर कोसळून बाजूला असलेल्या संरक्षक भितीकडे जावून स्थिरावल्याचा थरार पहायला मिळाला. ब्रिटिशकालीन चाळीस फुटाच्या मोरीवर ही घटना पहाटे पूर्वीचा वस परिसरात घडली. पहाटे साडेतीनच्या सुमारास कोणतेही वाहन रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळला. सकाळी 10.30 च्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाने हा दगड जेसीबीच्या साहाय्याने घाटात ढकलला. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान, हा प्रकार घडला तरी वाहतूक सुरळीत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ऐन पावसाळ्यातील पर्यटनाच्या तोंडावर हा प्रकार घडल्यामुळे त्याचा फटका आंबोली पर्यटनावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंभीर दखल घेऊन अशा प्रकारे दगड कोसळू नये यासाठी योग्य ती उपाययोजना राबवावी, अशी मागणी नगरसेविका राजगुरू यांनी केली आहे.
आंबोली घाट दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. सात ते आठ वर्षापूर्वी आंबोली घाट वारंवार कोसळण्याचा प्रकार सुरू होता. त्यामुळे पर्यायी रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेली अनेक वर्षे या विषयावर चर्चा सुरू आहे. मात्र अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर पर्याय काय? यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान घाट धोकादायक होत असल्यामुळे अशा प्रकारचे दगड कोसळल्याची घटना वारंवार घडत असते. यापूर्वी सात ते आठ वर्षांपूर्वी या ठिकाणी बेळगाव येथील एक तरुण डोक्यात दगड पडून ठार झाला होता. त्या घटनेला या प्रकारामुळे उजाळा मिळाला आहे. याबाबतची माहिती वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली आहे.
आंबोली सरपंच सावित्री पालयेकर यांची प्रशासनाकडे यासंबंधीची खबरदारी घेण्याची मागणी :
आंबोली पावसाळी पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर आंबोली घाटातील दगड पडून कोणताही मोठा अपघात होऊ नये यासाठी आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी आंबोली सरपंच सौ. सावित्री पालयेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे केली आहे.घाटातील एक भला मोठा दगड आज पहाटे रस्त्यावर कोसळला. सुदैवाने त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या पार्श्वभूमीवर वर्षा पर्यटनाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.
Rock Falls on Amboli Ghat Road
Rock Falls on Amboli Ghat Road
Rock Falls on Amboli Ghat Road
Rock Falls on Amboli Ghat Road
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements