Patna-Jharkhand passenger train catches fire in Bihar’s Lakhisarai
- Major fire breaks out in Patna-Jharkhand passenger train coaches
- आगीमुळे ट्रेनचे अनेक डबे जळून राख
पाटण्याहून (बिहार) जसीडीहला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमध्ये भीषण घटना घडली आहे. एका डब्याला लागलेल्या आगीमुळे आणखी एक डब्याला आग लागली. आग पसरण्याआधीच डब्यातील प्रवाशांनी उड्या मारून आपले जीव वाचवले. काही मिनिटांत आग ट्रेनच्या दोन डब्यांमध्ये पसरली. यामुळे दोन डबे पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. रेल्वेच्या पथकाच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. किउल जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन लखीसरायच्या किउल जंक्शनवर डाऊन लाईनवर थांबवण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी उशिरा ट्रेनला भीषण आग लागली. आग लागताच रेल्वेची मधली बोगी जळू लागली. त्यानंतर ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला आणि ट्रेनमधील प्रवासी उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते.
#WATCH | Lakhisarai, Bihar: Fire breaks out in the coaches of a Patna-Jharkhand passenger train. Efforts are underway to douse off the fire. Details are awaited. pic.twitter.com/GMg3SRMyTP
— ANI (@ANI) June 6, 2024
अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी हजर असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ताज्या माहितीनुसार, आगीमुळे ट्रेनचे अनेक डबे जळून राख झाले आहेत.
Patna-Jharkhand passenger train catches fire
Patna-Jharkhand passenger train catches fire
Patna-Jharkhand passenger train catches fire
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements