या सामन्यात एक प्रसंग असा आला…
NZ vs PAK T20I : पाकिस्तानने ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंडमध्येही पराभवाची मालिका कायम ठेवली आहे. 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत न्यूझीलंडने 3-0 ने आघाडी घेतली आहे. आता उर्वरित दोन सामन्यांची केवळ औपचारिकता असेल. असं असताना तिसऱ्या सामन्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. त्यासाठी आता मोहम्मद रिझवान ट्रोल होत आहे. तिसऱ्या टी20 सामन्यात पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय न्यूझीलंडच्या पथ्यावर पडला. न्यूझीलंडने 7 गडी गमवून 224 धावा केल्या आणि विजयासाठी 225 धावांचं आव्हान दिलं. इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानकडून सईम अयुब आणि मोहम्मद रिझवान ही जोडी मैदानात उतरली होती.
न्यूझीलंडकडून सहावं षटक मॅट हेन्री टाकत होता. पाचव्या चेंडूवर रिझवानने फटका मारला खरा पण धाव घेताना हातून बॅट पडली. पण त्याने हात क्रिझवर टेकवत दुसरी धाव घेतली. पण नॉन स्ट्रायकरला त्याच्याकडून नेमकी चूक घडली. ग्लोव्ह्ज क्रिज लाईनला स्पर्शच झाले नाहीत. त्यामुळे एक धाव शॉर्ट निघाली आणि पदरी फक्त एक धाव मिळाली.
आता सोशल मीडियावर त्याच्या कृतीबाबत ट्रोल केलं जात आहे. क्रिझला हात स्पर्श करण्यापेक्षा पायाने सहज करू शकला असता. पण कंबरेतून वाकून ग्लोव्हजने स्पर्श करणे हास्यास्पद होतं, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. न्यूझीलंडने दिलेल्या 225 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त 179 धावा करू शकला. न्यूझीलंडने पाकिस्तानला 45 धावांनी पराभूत केलं. आता शाहीन आफ्रिदीची कर्णधारपदी निवड योग्य की अयोग्य यावरूनही चर्चा रंगली आहे.
Mohammad Rizwan takes a run without a bat, resulting in a short run
Mohammad Rizwan tries to take a hilarious single without bat given short run during 3rd NZ vs PAK T20I
Mohammad Rizwan short run NZ vs PAK T20I
Mohammad Rizwan short run NZ vs PAK T20I
Mohammad Rizwan short run NZ vs PAK T20I
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements