काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी बूथ कार्यकर्त्यांची तुलना श्वानांशी केल्याने वाद निर्माण झाला आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानात (Ramleela Ground) शनिवारी न्यायसंकल्प रॅलीचं (Nyay Sankalp Rally) आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. ज्याप्रमाणे कुत्रा खरेदी करताना तो नीट भुंकतोय की नाही हे तपासलं जातं, त्याचप्रमाणे भुंकणाऱ्या कार्यकर्त्यांकडे बूथचं काम सोपवलं पाहिजे असं वादग्रस्त विधान यावेळी त्यांनी केलं. या रॅलीत काँग्रेसच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेते सहभागी झाले होते.
बूथ एंजटची नियुक्ती करताना विचारपूर्वक करा. अनेकजण अचानक गायब होतात. आमच्याकडे म्हणतात की, जेव्हा तुम्ही बाजारात जाता तेव्हा चांगला कुत्रा किंवा प्राणी खरेदी करायचा असेल तर बाजारात जाऊन योग्य चाचपणी करतात. जर इमानदार प्राणी हवा असेल तर त्याचा कान पकडून वर उचलतात. कान उचलल्यानंतर जर तो भुंकला तर ठीक, पण जर कुईकुई करत असेल तर कोणी घेत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही निवड करताना जो भुंकतोय, लढतोय, सोबत राहतोय त्याला घ्या. त्याला बूथचा एजंट बनवा, असं मल्लिकार्जून खर्गे म्हणाले आहेत.
जिस पार्टी का अध्यक्ष अपने संगठन की सबसे मज़बूत और महत्वपूर्ण कड़ी “बूथ एजेंट” को “कुत्ता” बनाकर उसका टेस्ट लेना चाहता है तो उस पार्टी की दुर्गति होनी तय ही है।
शर्मनाक। pic.twitter.com/O7UdO0rJvl
— Amit Malviya (@amitmalviya) February 3, 2024
मल्लिकार्जून खर्गेंनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मोदींनी फक्त सबका साथ, सबका विकास घोषणा दिली आहे. पण त्यांनी फक्त सत्यानाश केला आहे. पुढे ते म्हणाले की, राहुल गांधी देशाचं संविधान वाचवण्यासाठी भाजपा सरकारमध्ये होणाऱ्या अत्याचारांविरोधात लढत आहेत. जर तुम्ही या लढाईत हारलात, तर तुम्ही मोदींचे गुलाम व्हाल. मोदी या देशातील जनतेला गुलामीत ढकलतील. आज देशात 30 लाख रोजगार आहेत, पण त्या रिक्त जागा भरल्या जात नाही आहेत. जाणुनबुजून तिथे नोकरभरती केली जात नाही आहे.
भाजपाचे आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी मल्लिकार्जून खर्गे यांच्या विधानावर टीका केली आहे. ज्या पक्षाचा अध्यक्ष आपल्या संघटनेच्या सर्वात मजबूत आणि महत्त्वपूर्ण दुवा ‘बूथ एजंट’ला ‘कुत्रा’ बनवून त्याची चाचणी करु इच्छितो त्या पक्षाची घसरण नक्की आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
Mallikarjun Kharge compares Party Workers with Dog
Mallikarjun Kharge compares Party Workers with Dog
Mallikarjun Kharge compares Party Workers with Dog
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements