ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते अशोक सराफ #अभिनंदन
Maharashtra Bhushan award for actor Ashok Saraf
सिनेमा असो, नाटक किंवा छोट्या पडद्यावरची मालिका… भूमिका तुफान विनोदी असो, नर्म विनोदी असो किंवा धीरगंभीर… ज्यांनी आपल्या परिसस्पर्शानं शेकडो भूमिकांचं सोनं केलं, मराठी रसिकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि मराठी सिने-नाट्यसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले, असे अभिनयातील वजीर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना आज अत्यंत प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे (Maharashtra Bhushan award for actor Ashok Saraf).
अशोक सराफ हे मुळचे बेळगाव या गावचे पण त्यांचा जन्म मुंबईतील चिखलवाडी येथे झाला
चित्रपटसृष्टीत येण्याआधी ते एका सरकारी बँकेत काम करत होते. त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केल्यानंतरही काही वर्षं बँकेत काम केले. 1974 ला त्यांनी पहिला चित्रपट केला. आजही ते काम करतच आहेत. मराठी रंगभूमीसह मराठी आणि हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदानाबद्दल अशोक सराफ यांना हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे.
गाजलेले सिनेमे : गोंधळात गोंधळ, राम राम गंगाराम, गोष्ट धमाल नाम्याची आणि सुना येती घरा या सिनेमातील भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. तर पांडू हवालदार सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना राज्य सरकारच्या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. सवाई हवालदार या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना स्क्रीन Award मिळालेला आहे. तर मायका बिटुआ या सिनेमातील कामाबद्दल त्यांना भोजपुरी फिल्म पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. लगीन घाई, सारखं छातीत दुखतंय, प्रेमा तुझा रंग कसा? मनोमिलन, झालं एकदाचं, व्हॅक्यूम क्लिनर, हमीदाबाईची कोठी, संगीत संशय कल्लोळ, हसतखेळत आदी नाटकातील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन अशोक सराफ यांचे अभिनंदन केले. कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मनोरंजनसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांकडून अशोक सराफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे.
ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.
Maharashtra Bhushan award for actor Ashok Saraf
Maharashtra Bhushan award for actor Ashok Saraf
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements