मिसा भारती, हेमा यादव यांचेही नाव, ₹ 600 कोटींचा गैरव्यवहार?
नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन घेण्याच्या गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने राउज अव्हेन्यू न्यायालयात मंगळवारी दोषारोपपत्र दाखल केले (Land For Job Scam). बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि त्यांच्या कन्या मिसा भारती, हेमा यादव यांच्यासह हृदयानंद चौधरी व अमित कात्याल यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
2004 ते 2009 या कालावधीत केंद्रात लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना ‘लॅंड फॉर जॉब’ गैरव्यवहार झाला होता. रेल्वे खात्यात नोकरी देण्याच्या बदल्यात त्यावेळी लालूप्रसाद यादव कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जमिनी करण्यात आल्याचा तपास संस्थांचा आरोप आहे. यासंदर्भात लालूप्रसाद यादव यांची पत्नी व माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि त्यांची कन्या मिसा भारती यांची ‘ईडी’ने चौकशी केली होती. विशेष न्यायालयात सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 16 जानेवारीला होणार आहे.
₹ 600 कोटींचा गैरव्यवहार? : जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणात एकूण 16 आरोपी आहेत. ‘ईडी’कडून प्रथमच दाखल केलेल्या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि मिसा भारती यांच्यासह लालूप्रसाद यादव यांची कन्या हेमा यादव, हृदयानंद चौधरी आणि अमित कात्याल यांचा समावेश आहे. ED च्या आरोपपत्रात दोन कंपन्यांची नावेही आहेत. ‘ईडी’ने सुमारे 4700 पानी आरोपपत्र सादर केले आहे. ‘लॅंड फॉर जॉब’चा गैरव्यवहार 600 कोटी रुपयांचा असल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे. गुन्ह्याच्या माध्यमातून जमविण्यात आलेल्या संपत्तीपैकी 350 कोटी रुपयांची संपत्ती स्थावर स्वरूपाची आहे तर 250 कोटी रुपये बेनामी लोकांच्या माध्यमातून लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांकडे आले असल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे. हवाला प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) विशेष न्यायालयासमोर हे आरोपपत्र दाखल केले आहे. ‘ईडी’ने गेल्या नोव्हेंबर महिन्यात यासंदर्भात कात्यालला अटक केली होती. त्यावेळी लालूप्रसाद व तेजस्वी यादव यांना ‘ईडी’ने पाचारण केले. मात्र या दोन्ही नेत्यांनी चौकशीला हजेरी लावली नव्हती.
Land For Job Scam
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements